Viral Video: कंडक्टरची गुंडगिरी, तिकीटाच्या पैशांवरुन महिलेला मारहाण

Bengaluru Viral Video: मेट्रो किंवा बसमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये मारामारी होत असल्याचं आपण नेहमी पाहतो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात अशा घटनांचे व्हिडिओज लगेच व्हायरल होत असतात.
Fighting Viral Video
Fighting Viral Videosaam digital

Bus Conductor Beating A Women Video

मेट्रो (Metro)किंवा बसमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये मारामारी होत असल्याचं आपण नेहमी पाहतो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात अशा घटनांचे व्हिडिओज लगेच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा व्हिडिओ बेंगळुरूमध्ये एका बसमधील आहे. एक बस कंडकटरने महिला प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचं यात दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतांना दिसतोय. हा व्हिडिओ हेट डिटेक्टर यांच्या एक्स अकाउंटवरुन व्हायरल होतांना दिसतोय.

Fighting Viral Video
Bike Riding Viral Video: खतरों के खिलाडी! खडकाळ डोंगरावर तरूणीने चढविली बाईक, VIDEO समोर

आजकाल मारहाणीनेचे व्हिडिओज अनेकवेळा पहायला मिळतात, असाच एक व्हिडिओ बेंगळुरूच्या जयनगर परिसरातातील आहे. एका बसमधील कंडक्टरने एका प्रवाशी महिला बेदम मारहाण केलीय. ही घटना जयनगर परिसरातील सिद्धापुरा पोलीस स्टेशनजवळ घडली होती. यामध्ये एक महिला बिलेकल्ली ते शिवाजीनगर बीएमटीसीच्या बसमध्ये प्रवास करत होती. प्रवासादरम्यान महिलेची बसच्या कंटक्टरमध्ये काही कारणांवरून बाचाबाची सुरू झाली. या वादावादीचं रुपातर थेट हाणामारीत झालं.

या घटनेची माहिती मिळताचं,बेंगळुरू(Bengaluru) मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) ने त्या बस कंडक्टरला त्याच्या पदावरुन निलंबित करण्याची घोषणा केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कंडक्टरने महिलेला मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे.त्या व्हिडिओमध्ये बस कंडकटर आणि महिलेमध्ये वादविवाद झाला.

त्यानंतर कंडक्टने महिल्याच्या कानशिलात लगावल्याचं दिसत आहे. माहितीनुसार, हे भांडण बसच्या तिकीटावरुन झाल्याचं समजत आहे. BMTC ने या सर्व प्रकरणावर मौन सोडतं म्हटलं की, 'व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कंडकटरचे त्वरीत निलंबित करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहेत, या सर्व प्रकरणाची पोलिसांकडून तपास केला जात आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला बिलेकहल्ली येथे बसमध्ये चढली आणि मोफत प्रवासासाठी तिकीट मागितले. कंडक्टरने जेव्हा त्या महिलेला तिचे आधार कार्ड दाखवण्यास सांगितले तेव्हा तिने नकार देत त्या कंडकटरवर आवाज चढवत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने कंडकटरला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा राग आल्यामुळे कंडकटरने तिच्या पाठीला मारले. काही नेटकऱ्यानी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत, महिलेने कंडकटरवर प्रथम हात उचलून भांडणास सुरुवात केली असं म्हटलं.

Fighting Viral Video
Hardik Pandya Viral Video: मैदानावर असं काय घडलं? की हार्दिकला पळ काढावा लागला..पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com