Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Viral Video: दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है; लग्न मंडपातून मित्राने नवरदेवाच्या खिशातील नोटांवर मारला डल्ला

Viral Video: लग्नात खूप जास्त गडबड असते. त्यामुळे अनेक वस्तू गायब होतात. परंतु लग्नात तुमच्याच मित्राने पैसे चोरले तर वाईट वाटेल ना. असाच एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Groom Friend Steal Money At wedding Viral Video:

लग्न म्हटल्यावर डान्स, गाणी आणि मज्जा मस्ती येतेच. मात्र, लग्नात खूप जास्त गोंधळ उडतो. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देताना नवरा- नवरीच्या कुटुंबियांची तारांबळ उडते. कधी कधी तर लग्नात नवरा - नवरीसोबत स्कॅम होतो. आहेराचे पैसे गायब होतात, तर कोणतीतरी वस्तू गायब होते. असाच एका लग्नातील भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नात नवऱ्याचा मान-पान करण्याची पद्धत असते. त्यासाठी अनेकदा नवऱ्याच्या गळ्यात पैशांची माळ घालतात. परंतु या माळेतून कोणी पैसे काढून घेतले तर कसं वाटेल. एका लग्नात नवऱ्याच्याच मित्राने त्याच्या गळ्यातील पैशाच्या माळेतील पैसे काढून घेतले आहेत. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral News In marathi)

व्हायरल व्हिडिओमध्ये नवरा आणि त्याचा मित्र बसलेला दिसत आहे. नवरदेवाच्या गळ्यात पैशांचा हार घातलेला आहे. त्यात पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. नवरदेव आणि त्याचा मित्र कदाचित फोटो काढत असतील असे वाटत आहे. त्यानंतर अचानक नवरदेवाच्या मित्राने नवऱ्याच्या गळ्यातील हारातील ५०० नोट काढून घेतली. चेहऱ्यावरचे कोणतेही हावभाव न बदलता त्याने पैसे काढून घेतले आहेत. या व्हिडिओनंतर मीम्स दाखवण्यात आले आहेत. हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे.

funtaap या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवऱ्याच्या मित्राचा दारुचा जुगाड झाला. दोस्त दोस्त न राहा, मिशन पूर्ण झाले, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT