Girls Fight Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Girls Fight Viral Video: केस ओढले, लाथा-बुक्क्या मारल्या; पार्कमध्ये तरुणींची जबरदस्त हाणामारी;VIDEO VIRAL

Fight Video: सोशल मीडियावर सध्या दोन तरुणींच्या गटातील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत तरुणी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारल्याने दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ लग्नातील, हाणामारीचे असतात. सोशल मीडियावर नुकताच लखनऊमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुलींच्या दोन गटांमध्ये खूप मारामारी झाली आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत मुलींच्या दोन गटांमध्ये जबरदस्त भांडणे होताना दिसत आहे. या दोन्ही गटातील मुली एकमेकांच्या अंगावर धावून जात, एकमेकींचे केस ओढताना दिसत आहे. यानंतर या भांडणात लहान मुलेदेखील त्या मुलींना मारताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत सुरुवातील दोन मुली आपापसात भांडताना दिसत आहे. व्हिडिओत सुरुवातील एक मुलगी दुसऱ्या मुलीशी लांबून बोलताना दिसत आहे. तेवढ्यात मागून दुसरी मुलगी येते आणि त्या मुलीला मारायला सुरुवात करते. यानंतर अजून दोघी तिघीजणी येतात आणि मारामारी करताना दिसत आहे. या मुलींची मारामारी सुरु असताना अचानक लहान मुलेदेखील येतात आणि मारामारी करतात. या मुली अक्षरशः लाथा बुक्क्यांनी मारामारी करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील आंबेडकर मेमोरियल पार्कमध्ये ही घटना घडली होती. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकमेकींचे केस ओढून मारामारी करणे खूप भयंकर, हा व्हिडिओ पाहून वाटतंय की, केस नसलेले लोक अधिक सुरक्षित आहे. एका भांडणात सर्वांनी हात साफ केले आहेत, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT