Painter Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Painter Dance Video: हम भी कुछ कम नही! पुष्पा स्टाईल पेंटर; 'अंगारो सा' गाण्यावर नाचतानाचा हा जबरदस्त Video पाहा

Painter Dance On Angaro Sa Song: सध्या सोशल मीडियावर अंगारो सा गाण्याची क्रेझ आहे. अंगारो सा गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवल्या आहेत. घराचे रंगकाम करणाऱ्या दोन पेंटरनेदेखील या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात.यात सोशल मीडियावर सध्या पुष्पा २ चित्रपटातील अंगारो सा गाण्याचा ट्रेंड सुरु आहे. याच गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवल्या आहे. सर्वसामान्य लोक, इन्फ्लुएन्सर ते अगदी कलाकारांनादेखील या गाण्याची भुरळ पडली आहे. अनेक लोकांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत. असाच व्हिडिओ घराला रंगकाम करणाऱ्या पेंटरने बनवला आहे. त्यांनी या गाण्यावर हुक स्टेप करत मस्त रिल बनवली आहे.

व्हायरल व्हिडिओत दोन पेंटर घराला रंगकाम करताना दिसत आहे. रंगकाम करताना या दोघांनी अंगारो सा गाण्यावर रील बनवली आहे. creative_paint_by_g1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत दोन पेंटर मित्रांनी मस्त डान्स केला आहे. अल्लू अर्जुनची हुक स्टेप करत गाण्यावर ठेका धरला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला पुष्पा पेंटर, असे कॅप्शन देण्यात आले आहे.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ', 'अल्लू अर्जुनच्या गाण्याचे संपूर्ण देशभरातली चाहत्यांना वेड',अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

रश्मिका आणि अल्लू अर्जुनच्या गाण्यांवर अनेक कलाकारांनी ठेका धरला आहे. यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, युट्यूबर प्राजक्ता कोळी, ऐश्वर्या नारकर, पर्ण पेठे, रेश्मा शिंदे, रुपाली भोसळे आणि गौरी कुलकर्णी यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

SCROLL FOR NEXT