CCTV Footage: रंगकाम करताना कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; घटनेचा VIDEO आला समोर

Indore CCTV: मध्यप्रदेशात एका पेंटरचा रंगाकाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
CCTV Footage
CCTV FootageSaam Tv
Published On

Madhya Pradesh CCTV Footage:

सध्या वाढते प्रदुषण आणि जीवनशैलीतील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यात हृदयाविकाराचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्याच्या काळात कोणाला कधी हृदयविकाराचा झटका येईल सांगता येत नाही. अशीच घटना मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये झाली आहे.

मध्यप्रदेशात एका पेंटरचा रंगाकाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडिओत एका माणसाला अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि तो जमिनीवर कोसळतो. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी ही घटना घडली. आशिष असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एका रिपोर्टनुसार, इंदूरमधील एका साइटवर आशिष घराचे रंगकाम करत होता. अचानक आशिषला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो थोडा वेळ एका ठिकाणी बसला. काही वेळानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

CCTV Footage
Couple Viral Video: नवरीला घास भरवणं पडलं महागात; घास भरावयला गेला अन् स्वत: च मार खाल्ला, पहा VIDEO

व्हायरल व्हिडिओत एका घरात रंगकाम सुरू असताना दिसत आहे. तिथे दोन - तीन पेंटर काम करत आहे. आशिषदेखील तिथेच काम करत होता. त्याला थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने तो थोडा वेळ एके ठिकाणी बसला. त्यानंतर अचानक तो जमिनीवर कोसळला. त्याचे हात- पाय थरथरु लागले. यानंतर त्याला मदत करण्यासाठी त्याचे इतर सहकारी धावून आले. त्यांनी आरडोओरडा केला. आशिषला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने आशिषचा मृत्यू झाला. याआधीही हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

CCTV Footage
Viral Video: 'आमची जिम वापरायची नाही' म्हणत तरुणाला मारहाण, रागाच्या भरात डोळाच फोडला; पाहा CCTV VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com