Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कोट्यवधीच्या लॅम्बोर्गिनीला कोस्टल रोडवर आग, बर्निग कारचा VIDEO व्हायरल

Shocking Video: सध्या मुंबई शहरातून एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात भररस्त्यात एका महागड्या स्पोर्ट्स कारला आग लागलेली आहे. नक्की घटनेत पुढे काय घडले ते पहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Viral Video: सध्याच्या तरुणाईमध्ये स्पोर्ट्स कारचे अत्यंत वेड आहे. मग रस्त्यावरुन जाताना एखादी स्पोर्ट्स कार दिसल्यास लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ अन् फोटो काढत असे, मात्र आता स्पोर्ट्स कारचे नाव आले तर त्यात सर्वात जास्त 'लॅम्बोर्गिनी' या स्पोर्ट्स कारची सर्वांधिक सोशल मीडियावर चर्चा होत असते.

लॅम्बोर्गिनी या कारची सध्या महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशात एक अनोखी क्रेझ आहे, मात्र सध्या सोशल मीडियावर लॅम्बोर्गिनी कार संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल(Viral) होत आहे, ज्यात भररस्त्यात लॅम्बोर्गिनी या स्पोर्ट्स कारला आग लागलेली आहे.

लॅम्बोर्गिनी स्पोर्ट्स कारला आग लागल्याचा व्हिडिओ मुंबई शहरातील कोस्टल रोडवरील आहे. जिथून जाणाऱ्या या कारला अचानक आग लागली मात्र घटना स्थळी अग्निशमन दलाची गाडी आल्याने आग जास्त पसरली नाही. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे.

सध्या संपूर्ण व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताच तो व्हिडिओ प्रत्येकाला ''@SinghaniaGautam'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips : १७ ऑगस्टपासून ६ राशींचे नशीब पालटणार, पैसाच पैसा येणार; तुमची रास यात आहे का?

Maharashtra News Live Update: E20 विरोधात नागपूरात गडकरींच्या घराबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन

Kidney Symptoms: किडनी नीट काम करत नसेल तर सुरुवातीला शरीर देतं हे 7 मोठे संकेत!

Night Cream: तांदळाच्या पाण्यापासून घरीच तयार करा 'ही' नाईट क्रीम; सकाळी मिळेल नॅचरल गुलाबी चमक

Relationship Tips : प्रेमाच्या भरात चुका करू नका! जोडीदारामध्ये लग्नाआधी दिसणारे ‘हे’ संकेत दुर्लक्ष करणे पडेल महागात

SCROLL FOR NEXT