Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

आज शिक्षक दिनानिमित्त देशभरात सन्मानाचा माहोल असताना एका शिक्षकाचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांकडून हात-पाय दाबून घेत असल्याचे धक्कादायक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Manasvi Choudhary

आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांना विशेष महत्व असते. शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत असतात त्यांना चांगल्या - वाईट गोष्टींचे ज्ञान देतात मात्र सध्या अश्या एका शिक्षकांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचं डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही.

शिक्षक दिनानिमित्त देशभरात शिक्षकांचा सन्मान केला जात आहे. शिक्षकांप्रती आदराची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक शाळा, कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, संगीत यांचे आयोजन केले जाते. शिक्षकांना भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढवला जातो. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांकडून लाज वाटेल असे कृत्य करून घेत आहे. शिक्षकाने चक्क विद्यार्थ्याकडून शारिरीक मसाज करून घेतला आहे. त्याने मुलांना हात- पाय दाबायला सांगितले आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेमध्ये वर्गात एक शिक्षक मुलांकडून हात पाय दाबून घेत आहे. अगदी पाय टेबलवर ठेवून हा शिक्षक निवांत बसला आहे. अनेक मुले त्याचे पाय आणि हात दाबून देत आहे. सोशल मीडियावरील या शिक्षकांच्या संतापजनक प्रकारामुळे विद्यार्थांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

Maharashtra Live News Update : रवींद्र धंगेकर यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटानं डाव टाकला; महायुतीत फुटीची शक्यता

SCROLL FOR NEXT