Rescued Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: दक्षिण भारतात पुराचा हाहाकार...!भारतीय नौसेना आली धावून; VIDEO पहाच

Rescued Viral Video: मिचाँग चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसह अनेक शहरात, गावात पुरस्थिती निर्माण झाली आहे, अशातच आपल्याला भारतीय नौसेनेने हेलीकॉप्टरच्या साहाय्याने पुरात अडकलेल्या लोकांची सुटका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rescued Viral Video

बऱ्याच महिन्यांपासून मिचाँग चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसह अनेक शहरात, गावात पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. यामुळे लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. प्रत्येकजण यांच्या मदतीला धावून जात आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात आपल्याला भारतीय नौसेनेने हेलीकॉप्टरच्या साहाय्याने पुरात अडकलेल्या लोकांची सुटका केली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @Def_PRO_Chennai या एक्स सोशल प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ तामिळनाडूमधील तिरूनेवेली येथील आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,तामिळनाडूच्या दक्षिण भागात आलेल्या भीषण पुरानंतर ALH ने तिरुनेलवेली येथे दोन गर्भवती महिलांसह 17 जणांची सुटका केली. तसेच आणखी परिसरातील 25 लोकांना वाचवले.

व्हायरल व्हिडिओत आपल्याला दिसते की, हा व्हिडिओ हेलीकॉप्टरमधील एका व्यक्तीने कैद करण्यात आला आहे. त्यात एक व्यक्ती पुरात एका घरातील टॅरेसवर अडकलेला आहे. त्याच्या मदतीला भारतीय नौसेना धावून आलेली आहे. भारतीय नौसेनेमधील जवान हेलीकॉप्टरच्या साहाय्याने खाली अडकलेल्या व्यक्तीला सोडवत आहेत. यात त्यांनी एक लांब दोरी खाली टाकून त्याला एका मोठ्या जाळीत बसवतात आणि सुखरूप वर आणतात.

भारतीय नौसेनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. यावर विविध नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. कमेंटस् करत प्रत्येक यूजरने भारतीय नौसेनेचे आभार व्यक्त केलेत. व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असून अधिकचे व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT