Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : धावत्या बाईकच्या टाकीवर बसून कपलचा रोमान्स; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही वाटली लाज

Hyderabad News : हैद्राबादमध्ये एका तरुण जोडप्याचा बाईकवर अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी या जोडप्याचा शोध सुरू केला आहे.

Alisha Khedekar

प्रेमात पडलेल्या जोडप्यांचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओ हा हैद्राबाद मधील असून या व्हिडिओ मधील तरुण जोडप्याने बाईक वरून फिरताना अश्लील चाळे केल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे नागरिकांच्या डोक्यात तिडीक गेली आहे. या प्रकरणी पोलीस या जोडप्याचा शोध घेत आहेत.

हैदराबादमधील आरामघर उड्डाणपुलावरून जाताना एक तरुण जोडपं प्रेम संबंध करताना व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपं बाईकवरून जात असताना तरुण बाईकच्या टँकवर बसलेल्या तरुणीसोबत 'फिल्मी स्टाईल' रोमान्स करताना दिसत आहेत. तसेच तिने मागे तोंड करून चालत्या बाईकवरील तरुणाला मिठी मारली होती.

या तरुणीने तिच्या प्रियकराला अशा प्रकारे मिठी मारली की तिचा चेहरा दिसत नव्हता. हा व्हिडिओ त्या जोडप्याच्या मागे प्रवास करणाऱ्या एका नागरिकाने काढले आहे. या व्हिडिओमुळे नागरिकांचा संताप होत असून नागरिकांकडून या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या जोडप्याचा शोध पोलीस घेत असून या जोडप्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

एखाद्या जोडप्याने अशा प्रकारचे स्टंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातच, नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर एका पुरूष आणि महिलेने मोटारसायकलवरून धोकादायक स्टंट केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यामुळे स्थानिक वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ५५,००० रुपयांचा दंड ठोठावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods to clean heart vessels: 'या' पद्धतींनी लगेच वितळेल धमन्यांमध्ये जमा झालेली चरबी; हृदयाच्या रक्तवाहिन्या होतील एकदम स्वच्छ

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या पुतण्यासह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update : निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

Tanya Mittal: किती खोटं बोलशील...? तान्या मित्तल चुकीचे वय सांगून केला वाढदिवस साजरा; नेटकऱ्यांनी केली पोलखोल

Buldhana : खड्डा चुकवायला गेला अन् घात झाला, केळीचा ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT