Ayodhya Viral Video: Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: अयोध्या विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांना भावना अनावर, विमानातून उतरताच 'रामभूमी'वर डोकं टेकलं

Ayodhya Viral Video: देशभरात सर्वत्र राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Passengers

देशभरात सर्वत्र राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी आलेल्या भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा आणि नियोजन करण्यात येत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी देशभरातील साधू-संत, राजकीय नेते, अभिनेते यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात अयोध्या नगरीत विमान प्रवास करुन आलेले भक्त गहीवरून गेल्याचे दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओ अयोध्या नगरीतील विमानतळातील आहे. यात आपल्याला अनेक राम भक्त विमान प्रवास करुन येथे दाखल झाले आहेत. या व्हिडिओत आपल्याला दोन स्लाईड दिसत आहेत.

व्हिडिओच्या दोन्ही स्लाईडमध्ये दिसते की, विमाना लॅंड होताच विमानातून अनेक भगव्या रंगाचे कपडे परिधाण केलेले तसेच अनेक काही व्यक्ती उतरत आहेत. त्यानंतर जमिनीवर उतरताच भक्तांनी जमिनीवर आपले डोके नतमस्तक केले आहेत. सर्व भक्त भावूक झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओ आपल्याला @ani_trending या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की,' दिल्लीहून अयोध्येला पहिले उड्डाण उतरताच अनेकजण नतमस्तक झालेत'.सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स श्री रामाच्या नावाचा जय घोष होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT