Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवऱ्याला प्रयागराजला येता आले नाही, बायकोनं व्हिडीओ कॉल लावला अन्... पुढे जे केलं ते पाहून पोट धरून हसाल

Maha Kumbh Funny Moment: सोशल मीडियावर सध्या महाकुंभ मेळ्यामधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात एका महिलेने असं काही केलं ते पाहून प्रत्येकजण पोट धरुन हसत आहे.एकदा व्हिडिओ पाहाच.

Tanvi Pol

Maha Kumbh 2025 Video: महाकुंभ मेळ्याचा आज समारोप होत आहे.गेल्या एका महिन्यात महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातील भाविक येऊन गेले.सोशल मीडियावर महाकुंभ मेळ्यातील लाखोंचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यात पुन्हा एकदा एका महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.जो पाहून प्रत्येकजण पोट धरुन हसत आहे.नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला महाकुंभमध्ये(Mahakumbh) त्रिवेणी संगमावर आलेली असते.मात्र काही कारणांमुळे तिच्यासोबत तिच्या नवऱ्याला येता आले नाही.मात्र त्रिवेणी संगमात पवित्र स्नान त्याचे चुकू नये म्हणून त्या महिलेने नवऱ्याला व्हिडिओ कॉल केला आणि फोनच थेट त्रिवेणी संगमातच बुडवला.अशा हटके पद्धतीने महिलेने नवऱ्याची महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्याची इच्छा पूर्ण केली.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

'swatic12' या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करुन कॅप्शनमध्ये,''आपल्या देशात खूप हुशार लोक आहेत''असे मजेशीर वाक्य लिहिले आहे.व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारो लाईक्स केले आहे तर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळालेले आहे शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

महाकुंभमधील महिलेचा हा व्हिडिओ (Video)लोकांनी पसंतील आलेला आहे.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''धन्य झाले मी व्हिडिओ पाहून'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कुठून येतात असे लोक'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''पुरस्कार द्यावा अशा लोकांना'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT