Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ऐकावं ते नवलच! अमरावतीमध्ये मंदिरात मिळतो चक्क पैशांचा प्रसाद; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, व्हिडीओ व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या अमरावती शहरातील एका मंदिराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे असलेल्या मंदिरात प्रसाद म्हणून पैसे दिले जात आहेत.

Tanvi Pol

Amravati News: सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक अनोख्या गोष्टींची माहिती मिळत असते. मग समजलेल्या या गोष्टी कधी विदेशातील असतील तर कधी महाराष्ट्रातील असेल. सध्या सोशल मीडियावर अमरावती शहरात असलेल्या एका मंदिरातील प्रसादाची सर्वत्र चर्चा होत आहे, ज्या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून प्रसाद म्हणून भक्तांना चक्क पैसे दिले जातात.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला मंदिराच्या आतील मोठा गाभारा दिसून येत आहे. मंदिराच्या आतमध्ये देवाच्या दर्शानासाठी कमी प्रसाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दिसून येत आहेत. तुम्ही पाहिले तर एक व्यक्ती आलेल्या भक्तांना त्यांच्या हाताने एका मोठ्या भांड्यातील पैसे देत आहे तर दुसरा व्यक्ती त्याच्या हातातील एक एक पैसे त्या भांड्यात ठेवत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की मंदिराच्या बाहेर भाविकांची मोठ्या संख्येने लाईन लागलेली आहे. सध्या याचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमके प्रकरण काय?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ अमरावतीमधील आहे. जिथे दिवाळीच्या रात्री कालीमाता मंदिरात भक्तांना पैशाचा प्रसाद देण्यात येतो. ही परंपरा गेल्या ३९ वर्षांपासून चालत आलेली आहे. कालीमाता मंदिरातील पुजारीच मंदिरात येणाऱ्या भक्तांना लाह्यांसोबत पैसेही वाटतात. मिळालेल्या माहितीनुसार, १९८४ पासून अमरावती स्मशानभूमी परिसरातील काली माता मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या ठिकाणी लाह्यांसोबत दिवाळीच्या निमित्ताने पैशाच्या प्रसादाचे वितरण करण्यात येते. याचं कारण म्हणजे, येथील पैसे आपल्या दुकान, घर आणि तिजोरीमध्ये ठेवल्यास बरकत मिळत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन आटोपून भाविक प्रामुख्याने या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Kidney Racket : ५० हजार घेतले, ७४ लाख झाले; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या, विदर्भातील प्रकरणाने राज्यात खळबळ

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

SCROLL FOR NEXT