Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पाकिस्तानमध्ये'मिनी इंडिया'! कराचीमधील नवरात्री उत्सवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही

Navratri Special Viral Video: सोशल मीडियावर नवरात्री संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चक्क पाकिस्तानमध्ये नवरात्री सणाचा उत्साह साजरा होताना दिसून येत आहे.

Tanvi Pol

Navratri Celebrations In Karachi: भारतात दरवर्षी अनेक सण मोठ्या उत्सावात साजरे केले जातात. वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा शेवट सण उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतात. त्यातील सध्या महाराष्ट्र नाही तर राज्यभरात नवरात्री उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक भाषिक नागरिक नवरात्रीत सहभागी घेत असतात. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यास मिळतात, मात्र सध्या व्हायरल होत असलेला नवरात्री सणाचा व्हिडिओ महाराष्ट्रातीलच नाही तर चक्क पाकिस्तानमधील आहे. जिथे असलेले अनेक नागरिक गरबा खेळत देवीची स्थापना केल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल (Viral)व्हिडिओच्या सुरुवातीस रस्त्या दिसून येत आहे. जिथल्या रस्त्यावर नवरात्री निमित्ताने लायटिंग आणि भव्यदिव्य सजावट केलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवीस तुम्हाला रस्त्यावर केलेल्या लायटिंगच्यावर लक्ष्मी देवीची मोठी प्रतिमा असलेले पोस्टर दिसून येत आहे. त्यानंतर त्या असलेल्या रस्त्यावरील एक मार्केट आहे जिथे अनेक नागरिकांची गर्दी आहे आणि ज्या मार्केटमध्ये नवरात्रीचे साहित्य विकण्यासाठी ठेवलेले आहे. मग तिथे एख देवीचे मंदिरही दिसत आहे. व्हिडिओच्या पुढे एक परिसर दिसून येत आहे. जिथे साडी नेसलेल्या महिला दिसत येत असून काही वेळात गरबा (Garba)खेळताना असंख्य नागरिक दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाकिस्तानमधील कराची या शहरातील आहे. कराचीमधील व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''कराची पाकिस्तानमध्ये नवरात्रीचा चौथा दिवस'' असे लिहिण्यात आलेले असून त्या पुढे आणि मी तुम्हाला सांगेन की असे एक क्षेत्र आहे जिथे तुम्हाला मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्च चालण्याच्या अंतरावर सापडेल आणि जिथे लोक शांतता आणि सौहार्दावर विश्वास ठेवतात.

या भागाला अनेक लोक मिनी इंडिया असेही नाव देतात पण मी याला आमचा पाकिस्तान म्हणेन.हा जादुई, मंत्रमुग्ध करणारा आणि नवरात्रीचा उत्साह अनुभवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.प्रत्येकजण आनंदी होता, प्रत्येकजण हसत हसत नाचत होता आणि उत्सवाचा आनंद लुटत होता'' अशी माहिती लिहिण्यात आलेली आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ तीन दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला असून आतापर्यंत व्हिडिओला २३ हजार यूजर्संनी लाईक्स केले असून अजूनही मोठ्या संख्येने व्ह्यूज या व्हिडिओला मिळत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून असंख्य यूजर्संनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पाकिस्तानातील हिंदू समाजाला नवरात्रीच्या शुभेच्छा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा'' तर बऱ्याच यूजर्संनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT