Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे दादा, वहिनी मिळाली रे! नव्या नवरीनं बाइक गरागरा फिरवली, खतरनाक स्टंटचा VIDEO

Stunt Viral Video: सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या इन्स्टाग्रामवर एका नववधूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चक्क नववधू बाईकवर स्टंट करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bride bike Stunt Video Viral

लग्नात नव्या नवरीचा डान्स, गंमतीदार उखाणा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण एका नवरीचा हटके आणि खतरनाक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ही नववधू बाइकवर स्टंटबाजी करताना दिसतेय. तिनं जागेवरच बाइक गरागरा फिरवली. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे गरागरा न फिरतील तरच नवल! ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी लग्नातले गंमतीदार किस्से असतात, तर कधी लग्नातील हाणामाऱ्यांसारख्या भयानक प्रसंगांचे व्हिडिओ व्हायरल होतात. कधी नाचण्यावरून वर आणि वधूकडची मंडळी आपापसांत भिडतात, तर कधी गुलाबजाम, चिकन किंवा मानपान न केल्यावरून हाणामाऱ्या होतात आणि हेच व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. आता नवरी म्हटलं की, लाजाळू असते. पण सध्या एका 'बिनधास्त' नववधूचा व्हिडिओ इंटरनेटच्या विश्वास तुफान धुमाकूळ घालतोय. ही नववधू बाइक स्टंट करत आहे. तिचा 'स्किल' बघून सर्वच चक्रावून गेले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नववधूचा लूक 'सॉलिड' दिसतोय. नव्या नवरीनं लाल रंगाचा घाघरा परिधान केला आहे. तरीही बाइक स्टंट करताना कुठेही अवघडल्यासारखी दिसत नाही. बाइक स्टार्ट केली त्यावेळी कॉन्फिडन्स जबरदस्त असल्याचं दिसतं. डोळ्यांची पापणी लवण्याआधीच तिनं जागेवरच बाइक गर्रकन फिरवली

नववधूचा बाईक स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्राम सोशल प्लॅटर्फामवरील @be_harami या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय' की, ही कोणाची बायको आहे'?. नेमका व्हिडिओ कुठला आहे, हे समजू शकले नाही. पण तिथं असलेल्या कुणा एकानं ही स्टंटबाजी मोबाइल फोनच्या कॅमेऱ्यात कैद केल्याचे दिसते. .

नववधूच्या स्टंटबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओला हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया साइट्सवर शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

India Playing 11 vs Eng : ओव्हल कसोटीत टीम इंडियात होणार ४ बदल; अशी असू शकते संभाव्य प्लेइंग ११

Eduacation News: राज्याच्या ७० आयटीआयमध्ये नवा अभ्यासक्रम; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Shravan 2025: श्रावणात जेवणाची योग्य वेळ कोणती?

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT