Local Train Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनध्ये बँडबाजा बारात; चाकरमान्यांचा हटके डान्स व्हायरल

Local Train Viral Video: मुंबई लोकल म्हटलं तर गर्दी आणि भांडण एवढंच आपल्याला आठवतं. मात्र एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये मुंबईतील काही चाकरमानी बेभान होऊन लोकल ट्रेनमध्ये नाचण्याचा आनंद घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Local Train Viral Video

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याचे आयुष्य लोकल ट्रेनचा प्रवास केल्याशिवाय अपूर्ण आहे. लोकल ट्रेन अन् मुंबईचं अनोख नातं आहे. सोशल मीडियाला अनेक अतरंगी व्हिडिओचा खजिना म्हटलं जातं. या व्हिडिओच्या खजिन्यात मुंबई ट्रेन संबंधित अनेक थरारक, गमतीदार व्हिडिओ आहेत. सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई लोकल म्हटलं तर गर्दी आणि भांडण एवढंच आपल्याला आठवतं. मात्र एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबईतील काही चाकरमानी बेभान होऊन लोकल ट्रेनमध्ये नाचण्याचा आनंद घेत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेनमधून काही वादक मंडळी कार्यक्रम संपवून घरी परतत आहेत. त्याच दरम्यान लोकल ट्रेनमधून वादनाचे साहित्यही त्यांच्यासोबत असल्याचे आपल्याला पाहायल मिळते. लोकल ट्रेनच्या डब्ब्यात त्यांच्यासह इतर प्रवासी सुद्धा आहेत. मग काय त्यानंतर ही मंडळी लोकल ट्रेनच्या डब्ब्यातच बँड वाजवण्यास सुरुवात करतात. बँडच्या तालावर लोकल ट्रेनमधील प्रवाशांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला आहे. यामध्ये प्रत्येक वयोगटातील प्रवासी दिसत आहेत.

इस्टाग्रामवरील@pratik_jadhav_5836या अकाऊंटवर लोकल ट्रेनमधील व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर आपण मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये दिवाळीतील तुळशी विवाह सोहळा तसेच नवरात्रीमध्ये महिलांचा गरबा असे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. संबंधित यात्रेकरूंच्या मनसोक्त नाचण्याचा व्हिडिओ ट्रेनमधील सहप्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

इस्टाग्रामवरील व्हायरल व्हिडिओ विविध मीडिया प्लॅटर्फामवर शेअर केला जात आहे. अनेक नेटकरी कमेंटस् करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की,'ही आहे आमची मुंबई'. व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्सही मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT