Mother Daughter Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mother And Daughter Viral Video : पावसात भिजू नये म्हणून आईने मुलीला डोक्यावर उचलून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रसंगाने आईच्या प्रेमाचं निस्वार्थ रूप दाखवत सर्वांच्या मनाला भावनिक केलं आहे.

Alisha Khedekar

या जगात आईच्या प्रेमापेक्षा मोठं काही नाही हे खर आहे. आईची माया ही आपल्याला सतत जाणवते. आपल्या पाठीशी कोणत्याही प्रसंगी आई खंबीर उभी असते. असचं एक उदाहरण एका सोशल मीडियाच्या व्हिडिओमधून व्हायरल होत आहे. मुसळधार पावसात मुलगी भिजू नये म्हणून आईने थेट मुलीला डोक्यावर उचलून घेतले आहे. आई आणि मुलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चर्चेत आहे. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निःस्वार्थ आईचं प्रेम दिसत आहे. मुलीला शाळेत सोडायला जाताना मुसळधार पावसात भिजू नये म्हणून तिच्या आईने तिला डोक्यावर उचलून घेतले आहे. एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने मुलीला सांभाळत ती आई मुलीला घेऊन निघाली आहे.

या गोड प्रसंगाचा व्हिडिओ एका व्यक्तीने चित्रित करून आईच्या या ममतेच कौतुक केलं आहे. ही व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडली असून त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट केली आहे की, आई नेहमीच आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम असते आणि त्यांना प्रत्येक अडचणीपासून वाचवते. आई आणि मुलीचा हा व्हिडिओ भारावून टाकणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT