सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आहारावर परिणाम होत आहे. त्यामुळे लोक शरीर सृदृढ राहण्यासाठी पोषक आहार घेतात. तसेच अनेकजण जिममध्ये जातात. जिममधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जिममध्ये जाताना लोक जीम आऊटफिट घालून जातात. परंतु तुम्ही कधी साडी घालून जीममध्ये व्यायाम करताना पाहिलय का? असाच एक व्हिडिओ सोशळ मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral News In marathi)
जीममध्ये सामान्यतः जिम आऊटफिट, स्ट्रचेबल आणि हलके कपडे घालून जातात. जेणेकरुन व्यायाम करताना कोणताही त्रास होऊ नये. व्यायाम करताना खूप सोपे जावे यासाठी जीम आऊटफिट घालतात.तुम्ही कधी साडी घालून जिममध्ये व्यायाम केला आहे का? एका महिलेने चक्क जीममध्ये साडी नेसून व्यायाम केला आहे. एका महिलेचा जीममध्ये साडीमध्ये पुल अप करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत एक महिला जिममध्ये साडी नेसून वर्कआऊट करताना दिसत आहे. पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीत तरुणी व्यायाम करत आहे. हे आयकॉनिक आहे, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
none_dini_ या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'भारतीय नारी सर्वात भारी', 'उत्तम', 'साडीमध्ये वर्क आऊट करणे खूपच अवघड आहे', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.