CCTV Footage saam digital
व्हायरल न्यूज

CCTV Footage: कार पार्किंगवरुन नवरा-बायकोला बेदम मारहाण; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Bengaluru Video: अनेकवेळा आपण राहत असलेल्या ठिकाणी पार्किंगच्या जागेवरुन अनेक वादविवाद होत असतात.मात्र अनेकवेळा या वादविवादाचे रुपांतर भयंकर अशा हाणामारीमध्येही होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Family Thrashes Couple Over Parking Issue

अनेकवेळा आपण राहत असलेल्या ठिकाणी पार्किंगच्या जागेवरुन अनेक वादविवाद होत असतात.मात्र अनेकवेळा या वादविवादाचे रुपांतर भयंकर अशा हाणामारीमध्येही होते. अशात सोशल मिडियावर अशीच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात बेंगळूरमध्ये राहणाऱ्या एक जोडप्याला एका कुटुंबाने पार्किंगच्या(Parking) गोष्टीवरुन मारहाण केलेली आहे.सध्या सोशल मीडियावर सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ बेंगळूरमधील(Bengaluru) दोड्डणेकुंडी परिसरातील असून मारहाण झालेले जोडपे बेळगाव येथील रहिवासी असून ते कामानिमित्त बेंगळूर येथे वास्तव्यास होते. बेळगावचे रहिवासी असलेल्या जोडप्यांनी त्यांचे वाहन मारहाण करत असलेल्या व्यक्तीच्या घरासमोर असलेल्या रिकाम्या जागेत पार्किंग केले होते.मात्र वाद कशावरुन सुरु झाले हे नक्की समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, बेळगावचे रहिवासी असलेल्या जोडप्यांपैकी व्यक्तीला बेंगळूरमधील वास्तव्यास असणारे काही कुटुंबातीस पुरुष बेदम मारहाण करताना दिसत आहेत. त्यातच त्या व्यक्तीची पत्नी सर्व प्रकार तिच्या कॅमेऱ्यात कैद करत आहे.

धक्कादायक म्हणजे त्या कुटुंबातील एक महिला बेळगावचे रहिवासी असलेल्या महिलेले मारण्याचा प्रयत्न करते मात्र तरीही ती व्हिडिओ काढण्याचा थांबवत नाही. सर्व कुटुंब त्या व्यक्तीला अतिशय हिसंक पद्धतीने मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनाकडून या प्रकरणाबद्दलचा अधिकचा तपास करण्यात येते आहे.

बेंगळूरमधील व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवरील @AnaghaDeshpand6 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केल्या आहेत. प्रत्येकाने यूजरने लिहिले आहे की,' त्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करावी असे म्हटंले आहे' तसेच व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूजही मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT