Shocking News Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking News: भांडण झालं, रस्त्यात नवऱ्याला अडवलं, कारच्या बोनेटवर चढली अन् धू धू धुतलं, कपल्सचा Video होतोय व्हायरल

Husband And Wife Fighting viral video : मेरठमध्ये पती-पत्नीचा रस्त्यावर तुफान वाद झाला. महिलेने कारच्या बोनेटवर चढून पतीला मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Manasvi Choudhary

उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पती आणि पत्नीमध्ये तुफान हाणामारी झालेली पाहायला मिळत आहे. भर रस्त्यात या दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या दोघांनी रस्त्यावरील सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे. पती- पत्नीच्या नात्यामधील हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

मेरठच्या महिला पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सोमवारी घडलेल्या या घटनेत महिलेचा पती कार चालवत असताना ही महिला कारच्या बोनेटवर चढली आहे. भर रस्त्यात महिलेने हा अपघात घडवण्याचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश नावाचा तरूण कार चालवत होता. मात्र कार चालवत असताना त्याची पत्नी आली आणि कारच्या बोनेटवर चढली आहे. कौटुंबिक वादामुळे ही महिला संतापली आहे. या दोघांचा वाद रस्त्यात सुरू झाला आहे. कारमधून पती बाहेर येताच महिलेने त्याला मारण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू जाले आहे. यामुळे रस्त्यावर बघ्याची गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी देखील झाली आहे.

या महिलेने पतीच्या भर रस्त्यात मुसक्या आवळल्या आहेत. तिने त्याला कपडे फाटेपर्यत मारले आहे. महिलेने डोक्यात बुक्या मारल्या आहेत एवढच नाही तर ही हाताला देखील चावताना दिसत आहे. आजूबाजूंची लोक या महिलेला थाबंवताना दिसत आहे. तरी देखील महिला शांत होत नाही.

महिला पोलिस स्टेशच्या परिसरात हा वाद झाला आहे. अनेक अधिकारी या पोलिस स्टेशनला भेट देतात. यामुळे महिलेने कोणतीही शिस्त न पाळता पतीशी भांडण केले आहे. यामुळे घटनास्थळी पोलिस देखील उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या जोडप्यामध्ये कशामुळे वाद झाला आहे.याची चौकशीला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historical Places : प्रेमाचे अद्वितीय प्रतीक! जोडीदारासोबत आयुष्यात एकदा तरी 'हे' ठिकाण फिराच

बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट! 'बिग बॉस' फेम बिचुकले मैदानात; थेट सुनेत्रा पवारांना देणार आव्हान

Maharashtra Live News Update : मध्य प्रदेशमध्ये इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Accident : २२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Face Care: उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा देण्यासाठी आठवड्यातून २ वेळा लावा 'हा' खास फेसपॅक

SCROLL FOR NEXT