Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सखा पांडुरंग...बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने सूर धरला; नवरीसह वऱ्हाडी भक्ती गीतात हरवले

Groom Performance Video: सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरदेवाने जे केलं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Tanvi Pol

Groom Viral Video: सोशल मीडियावर दरवेळी हटके व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.त्यात पुन्हा एकदा एका लग्न सोहळ्यात नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात अनोख्या पद्धतीने शास्त्रीय गायनासह भक्तिगीते आणि भावगित सादर केले. त्याच्या गायकीतून लग्नात आलेले वऱ्हाडी मंडळी भक्तिगीतात हरवून गेलेले आहे.सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या नवरदेवाचे नाव ऋषिकेश गोरे असून हा व्हिडिओ सांगोला तालुक्यातील असल्याचे समजते. ऋषिकेश गोरे आणि हर्षाली दिघे यांचा विवाह सोहळा रविवारी पार पडला त्या वेळी नवरेदवाने सर्वांना त्याच्या या कलेने अवाक् केले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नकार्याचा परिसर दिसत आहे.लग्नाला आलेली वऱ्हाडी मंडळी सर्वजण जमिनीवर बसलेली आहेत,अशातच तुम्ही स्टेजवर पाहिले तर दिसेल की चक्क नवरदेव स्टेजवर बसून भक्तीगीत गात आहे.त्याच्या सोबत अनेक वादक मंडळी त्याला साद देत आहेत.सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कायम लग्नकार्यातील अनेक व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात.कधी लग्नात नवरदेवाचा आणि नवरीचा धम्माकेदार डान्स पाहण्यासाठी मिळतो तर कधी डीजेच्या तालावर सर्वजण डान्स करत असतात,मात्र सध्या हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून सर्वजण या नवरदेवाचे कौतुक करत आहेत.

टीप: नवरदेवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 4 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

SCROLL FOR NEXT