सध्या तरुण वर्गापासून ते वृद्धापर्यंत मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मोबाईलचा वापर कामापेक्षा इतर मनोरंजनासाठी होऊ लागला आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे अनेक समस्यांना व्यक्तींना सामोरे जावे लागते. तरुणांमध्ये मोबाईलचा जास्त वापर दिसून येतो. काही काळापासून ऑनलाइन गेमिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यातं सर्वात जास्त व्यसन तरुणांमध्ये आहे. प्रत्येक तरुण कोणती ना कोणती ऑनलाइन गेम खेळत असतो. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एक तरुण चक्क स्वत:च्याचं लग्नाच्या वरातीत मोबाईलवर गेम खेळताना दिसून येतोय.
लग्नाचा दिवस प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील खास दिवस असतो. एका एका क्षणाचा अनुभव नववधु-नवरदेव घेत असतो. लग्नाच्या वरातीत तर काही नवरदेव नाचण्याचा आनंद घेत असतानाचे अनेक व्हिडिओ आपण याआधी पाहिलेही आहेत. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील नवरदेव चक्क ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त आहे.सध्या सोशल मीडियावर या व्हायरल होत असलेल्याच व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत लग्नाची वरात जात असताना दिसते. वरातीत नवरा-नवरीला घेऊन जाणारा रथ आहे. सुंदर तसेच आकर्षक पद्धतीने रथ सजवला आहे.रथावर नवरा-नवरी बसलेले आपल्याला दिसून येत आहे. मात्र नवरदेव चक्क गेम खेळताना व्यस्त दिसून येतोय. त्याच्या आजूबाजूला काय सुरु आहे याचे त्याला कसलेच भान नाही. पहिल्यांदा स्वत:च्या लग्नातील वरातीत गेम खेळताना असा नवरदेव पाहिला आहे.
एका बाजूला काही तरुण वर्ग आहे जो लग्न जमत नाही म्हणून दु:खी आहे परंतू हा नवरदेव जो ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त आहे. या नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @ghantaa या इन्स्टाअकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. काही महिन्यापूर्वी PUBGया लोकप्रिय गेमने देशातील तरुण वर्गाला वेड लावले होते.
या गेमिंगच्या संबंधित अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत.इन्स्टाग्रावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी गमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत. व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.