Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील लग्नविधी
महाराष्ट्रातील लग्नविधी म्हणजे संस्कृतीची सांगड घातलेला हा सोहळा.
हिंदू संस्कृतीनुसार लग्न विधी धार्मिक प्रथा पध्दतीनी पार पडणे महत्वाचे आहे.
केळवण सोहळा ही एक महत्वाची विवाह परंपरा आहे.
लग्न ठरल्यानंतर मुला-मुलीचे केळवण करण्याची पध्दत आजही महाराष्ट्रीयन संस्कृतीत साजरी होते.
केळवण हा सोहळा वर आणि वधू दोघांच्याही घरी असतो. यादरम्यान कुळदेवतेची पूजा केली जाते.
केळवणाच्या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाईक, सखेसोयरे हे लग्न ठरलेल्या मुला-मुलींना जेवणाचं आमंत्रण करतात.
केळवणाला मुला-मुलींच्या आवडीच्या पदार्थाची खास मेजवानी असते.
प्रेमाचं प्रतिक म्हणून मुलगा किंवा मुलीला भेटवस्तू दिले जाते व शुभेच्छांचा वर्षाव केला जातो.
केळवण हा लग्नाआधी केला जाणारा खास क्षण आहे.
यानिमित्ताने घरातील कुटुंब एकत्र येतात व होणाऱ्या नववधु वराला काही मोलाचे सल्ले दिले जातात.
पूर्वीच्या काळी दळण-वळणाची साधने नव्हती यामुळे लग्न झाल्यानंतर मुलीली माहेरी येणे शक्य नव्हते.
यामुळेच नववधु व वराला लग्नापूर्वी नातेवाईक, मित्रमंडळी घरी बोलावून गोडाधोडाचे पदार्थ बनवून खाऊ घालत.