Grandmother Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Grandmother Dance Video: आजी जोमात बाकी सगळे कोमात! नातवाच्या खांद्यावर चढून आजीबाईंचा जबरा डान्स; VIDEO VIRAL

Grandmother Dance Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका आजीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आजी मिरवणुकीत नातवाच्या खांद्यावर बसून जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ हे डान्सचे, लग्नातील आणि मिरवणुकीतील असतात. डान्स म्हटलं की कोणालाच वयाचं भान नसतं. मोठ्यापासून ते लहानांपासून सर्वजण मनोसोक्त डान्स करतात.असाच एका आजीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक वयस्कर आजी मनोसोक्त डान्स करताना दिसत आहे. एका व्यक्तीच्या खांद्यावर बसून हटके स्टेप्स करताना आजीबाई दिसत आहे. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह या आजीमध्ये आहे. आजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका गावात मिरवणुक सुरु असताना दिसत आहे. ही मिरवणुक ढोल-ताशाच्या गजरात काढताना दिसत आहे.देवीच्या या मिरवणुकीत गावातील अनेकजण डान्स करताना दिसत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण डिजेच्या तालावर थिरकताना दिसत आहे. याच मिरवणुकीत एक वयस्कर आजीदेखील डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत आजीने नऊवारी साडी नेसलेली दिसत आहे. नऊवारी साडी अन् डोक्यावर टोपी असा लूक आजीने केला आहे. या आजीने साठी नक्कीच ओलांडली असेल. साठी ओलांडली तरीही या आजीचा उत्साह काही कमी झालेला नाही.ही आजी खूप जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. (Grandmother Dance Video)

saee_solkar23 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी या आजीच्या वयाचं आणि उत्साहाचं कौतुक केलं आहे. 'आजी जोमात बाकी सगळे कोमात', अशी कमेंट या व्हिडिओवर आली आहे. (Grandmother Dance Viral video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

Shocking : दुर्दैवी घटना! देवदर्शनाला गेलेल्या तरुणावर काळाचा घाला, समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवलं

SCROLL FOR NEXT