मुंबई : एक गोळी खा आणि व्यायामाची चिंता सोडा...असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...कित्येक जणांना व्यायामाचा कंटाळा येतो, त्यामुळे आता एका गोळीने व्यायामासारखाच आनंद घेता येणाराय...मात्र, हा दावा खरा आहे का...? एका गोळीमुळे व्यायामाचे फायदे होऊ शकतात का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, आता आपल्याला व्यायामाची गोळी खाता येणार आहे. डेन्मार्कमधील वैज्ञानिकांनी एक गोळी तयार केलीय. ही एक्सरसाईज पिल घेतल्यानंतर व्यायाम़ामुळे आपल्या शरीरामध्ये जसे बदल घडतात तसेच बदल घडतील असा दावा वैज्ञानिकांनी केलाय'.
डेन्मार्कमधील वैज्ञानिकांनी हा दावा केलाय. त्यामुळे आम्ही याची अधिक पडताळणी करण्यासाठी रिसर्च केला...त्यावेळी जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये याबाबत दावा केल्याचं आढळून आलं...या गोळीचे सध्या उंदरांवर प्रयोग सुरू आहे. त्यागोळीबाबत सविस्तर माहिती पाहुयात...
डेन्मार्कमध्ये तयार केलेल्या गोळीचं नाव LaKe असं आहे
उंदरांवर या गोळीचा परिणाम दिसून आला.
औषध घेतल्यानंतर उंदरांच्या मांसपेशींची ताकद वाढली.
माणसांवरही सध्या या गोळीचा रिसर्च सुरू आहे.
एक गोळी खाल्ल्यावर व्यायामाची गरज नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे...मात्र, आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत आणखी रिसर्च केला...अशा प्रकारे गोळी घेतल्याने व्यायामाची गरज नाही का...? अशा कोणत्या गोळ्या आहेत का...? याची तपासणी करण्यासाठी आमच्या टीमने इंटरनॅशनल मॅगझिन पडताळून पाहिली...त्यावेळी अमेरिकेत, युरोपमध्येही अशा प्रकारचे रिसर्च सुरू असल्याचं आढळून आलं...
डेन्मार्कप्रमाणे अमेरिकेतही यावर रिसर्च सुरू
अमेरिकेत या गोळीचं नाव SLU-PP-332 आहे
दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापर होईल
ही गोळी व्यायामाची जागा घेऊ शकणार नाही
माणसांवरही क्लिनिकल ट्रायलची परवानगी मागितलीय
माणसांमध्ये ही चाचणी यशस्वी ठरली तर या गोळीचा वापर दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी देखील करता येऊ शकतो...जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा शरीरामध्ये एस्ट्रोजन रिलेटेड रिसेप्टर्स कार्यान्वित होतात...हे रिसेप्टर्स मांसपेशी, हृदय आणि मेंदूमध्ये देखील आढळतात...
शास्त्रज्ञ एलगेंडी यांनी एक स्टार्टअप कंपनी सुरू केलीय...असं असलं तरी ही गोळी व्यायामाची जागा घेऊ शकणार नाही...व्यायामाचे फायदे मिळतात म्हणून व्यायाम बंद करणं योग्य नसल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलंय...मात्र, ज्यांना व्यायाम शक्य नाही त्यांच्यासाठी हे फायदेशीर असल्याचं म्हटलंय...भारतातही यावर रिसर्च सुरू असल्याचं समोर आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.