Grandfather Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आजोबांनी ४० वर्षांच्या संसारानंतर बायकोशी घेतला पंगा; पाठीवर थाप मारल्यानंतर आजीने वटारले डोळे;VIDEO VIRAL

Grandfather Viral Video: संसार म्हटल्यावर नवरा बायकोमध्ये प्रेम, राग-रुसवा सुरुच राहतो. त्यांच्या रागातदेखील त्यांचे एकमेकांवर प्रेम असते. असाच एक आजी आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतात. त्यात लहानांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचा समावेश असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या आशयाचे व्हिडिओ बनवत असतात. काहीजण डान्सचे, तर काही जण गाण्यांचे व्हिडिओ तयार करत असतात. अनेक कपल तर घरच्या भांडणाचेही व्हिडिओ बनवत असतात. असाच एक प्रेम आणि राग असलेला आजी-आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत आजी-आजोबांच्या लग्नाला जवळपास ४० वर्ष पूर्ण झाली आहे. ४० वर्ष पूर्ण होऊनही त्यांच्यातील प्रेम काही कमी झाले नाही. प्रेमासोबतच त्यांच्या नात्यात थोडासा तडका म्हणजे राग- रुसवा होत आहे. असाच रुसवा या आजी-आजोंबाच्या नात्यातही दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत आजी हातात ताट घेऊन उभ्या आहेत. आजी हातात ताट घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहे. आजीबाई काहीतरी कडधान्य निवडताना दिसत आहे. याचवेळी आजोबा आजीला चिडवताना दिसत आहे. आजोबा म्हणतात की, ४० वर्ष झाली तरी आमची युती आहे. जमत तर आजिबात नाही पण मोडत पण बिल्कुल नाही. यानंतर आजोबा जोरजोरात हसायला लागतात. त्यानंतर मात्र, आजी आजोबांकडे एकदम रागाने बघतात. त्यांच्या या रागातदेखील प्रेम आहे. परंतु त्यांचा हा राग सोशल मीडियावर सर्वांनाच आवडला आहे.

Kharotevijay या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाळीस वर्ष तुमची युती आहे आणि ती पुढेही अशीच राहिल. तुझ्याशी पटेना आणि तुझ्यावाचून करमेन, असं या आजीबाबांचे झाले आहे. अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओ उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

SCROLL FOR NEXT