Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: खारघरमध्ये दिसला सोनेरी कोल्हा, व्हिडीओ व्हायरल

Kharghar News: सोशल मीडियावर सध्या खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये कोल्ह्यांचा खुलेआम वावर होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Viral Video: खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये कोल्ह्यांचा खुलेआम वावर होत असल्याचे निदर्शनास आलेय. वनसंपदेचा होणारा ऱ्हास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला असून त्यांच्या हक्काचे घर सुरक्षित राहिलेले नाही. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात असलेले कोल्हे रस्त्यावर, तसेच खाडीकिनारी आणि आता थेट सेंट्रल पार्क परिसरात खुलेआम वावर करीत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आलाय.

गेल्या तीन-चार वर्षांपासून जंगली प्राण्यांचे खारघर(Kharghar) सेंट्रल पार्कमधील पाणथळ (Wetland), तसेच खाडीकिनारा भागात खुलेआम वावर करीत असल्याचे दिसून येतेय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सेक्टर १५ मधील रस्त्यावर सुवर्ण कोल्हा मृतावस्थेत आढळला; तर मागील वर्षी कोल्ह्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आले होते.

नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने वारंवार नागरी वस्तीमध्ये वन्यजीव दिसण्याच्या घटना घडत आहेत. भक्ष्याच्या शोधात असलेले कोल्हे खाडीकिनारा आणि सेंट्रल पार्कलगत असलेले रस्ते आणि पदपथावर निदर्शनास येत आहेत. सेंट्रल पार्क उद्यानात श्वानांना दिले जाणारे खाद्य त्यांना मिळत असल्यामुळे कोल्हे सेंट्रल पार्क जवळील झाडी झूडपात वास्तव्य करीत असावेत असा अंदाज पर्यावरण प्रेमी व्यक्त करतायत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये कोल्ह्यांचा खुलेआम वावर'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने नेटकऱ्यांनीही पाहिला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT