Elephant Birthday Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Elephant Birthday Video: वाह! गळ्यात हार, दागिने घालून केलं हत्तीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; पाहा VIDEO

22 Year Old Elephant Birthday Celebration Video: तमिळनाडूमध्ये एका हत्तीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. हत्तीला हार घालून त्याच्या आवडीचे पदार्थ म्हणजेच फळे त्याला खायला देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडिओ असतात. परंतु तुम्ही कधी हत्तीला पाळल्याचे पाहिलेय का? हत्तीला मोठ्या जंगलात पाळले जाते. परंतु तुम्ही कधी हत्तीचा वाढदिवस साजरा केलेला ऐकलंय का? तमिळनाडूतील एका गावात हत्तीचा वाढदिवस साजरा केला आहे.

तमिळनाडूतील एका गावात गावकऱ्यांनी हत्तीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. तमिळनाडूतील काही व्यक्तींनी हत्तीच्या गळ्यात हार घालून, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालून त्याला सजवलं आहे. त्यानंतर हत्तीच्या आजूबाजूला अनेक गावकरी उभे असल्याचे दिसत आहे. हत्तीच्या वाढदिवसाचं सेलीब्रेशन हटके पद्धतीने केलं आहे. हत्तीच्या समोर द्राक्षे, टरबूज, डाळींब, गाजर आणि इतर फळांनी भरलेल्या दोन पराती ठेवलेल्या दिसत आहे. या दोन परातींमधील फळे उचलण्यासाठी हत्ती आपली सोंड उचलतो तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक हॅप्पी बर्थडे हे गाण गात त्याला शुभेच्छा देतात. हत्तीचा हा अनोख्या पद्धतीने वाढदिवसाचे सेलिब्रेशन खरंच खूप मस्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हत्तीचे नाव अखिला असे आहे. हत्तीचा २२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तमिळनाडूतील एका मंदिराच्या परिसरात हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. हत्तीचा वाढदिवस एखाद्या सणासारखाच साजरा करण्यात आला आहे. Nature is Amazing या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT