Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आजोबांचा प्रताप! धावत्या ट्रेनच्या दरवाजात केला धोकादायक स्टंट, VIDEO पाहून उडेल झोप

Old Man Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेल आहे. ज्यात आजोबा चक्क धावत्या ट्रेनमध्ये जीवघेणा स्टंट करताना दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट व्हिडिओ बनवताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या धक्कादायक घटनेचे व्हिडिओ आपल्याला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून पाहण्यास मिळतात. मात्र तरीही धोकादायक ठिकाणी स्टंट करणं बंद झालेले नाही. याचा प्रत्यय एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून येत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आजोबांचा आहे, ज्यात त्यांनी चक्क धावत्या एक्सप्रेसच्या दरवाजात लटकून स्टंट केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओत एक सुपरफास्ट वेगाने धावणारी एक ट्रेन दिसून येत आहे. या धावत्या ट्रेनच्या एका दरवाज्यात एक आजोबा दिसून येत आहेत. मात्र हे आजोबा फक्त दरवाजात उभे नसून धावत्या ट्रेनच्या बाहेरील बाजूस लटकलेले आहेत. धक्कादायक(Shocking) बाब म्हणजे हे आजोबा धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभे राहून धक्कादायक आणि जीवघेणी स्टंटबाजी(Shockingstunt) करत आहे. याचा हा स्टंट(Stunt) पाहून कधीही जीव जावू शकतो असे वाटते मात्र शेवट पर्यंत आजोबा स्टंट करताना दिसून येत आहेत.

आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@mumbai.hai.bhai_'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ इन्स्टाग्रावर शेअर करत कॅप्शनमध्ये,''अभी ये हाल है तो जवानी मे कितना हुड़दंग मचाया होगा'' असे गमतीदाक कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओ शेअर होऊन सहा दिवस झाले असून व्हिडिओला सहा दिवसातच तब्बल ९३ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहे तर अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' आजोबांचा स्वॅग लेय हटका आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' जबरदस्त'' तर अशा अनेकांनी संतप्तही प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

कोरियाचा किम जोंगही युद्धाच्या मैदानात? किम जोंगचा 10 मिसाईल्सचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार?

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

SCROLL FOR NEXT