Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ड्रायव्हरशिवाय धावली बस; थेट दुकानात घुसल्याचा थरारक VIDEO आला समोर

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या नंदुरबार जिल्ह्यातील घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. घडलेल्या या घटनेत नक्की काय घडले ते एकदा व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

nandurbar Viral News: नवापूर बस स्थानकात बसच्या अपघाताची विचित्र घटना घडली असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. नवापूर बस स्थानकात उभी असलेली एस.टी. बस अचानक अनियंत्रित होत स्थानकासमोरील दुकानांमध्ये घुसली. घडलेल्या दुर्घटनेत दोन दुकाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसमध्ये बसलेले दोन शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दुकान उध्वस्त, थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना नंदुरबारमधील नवापूर स्थानकातील आहे. जिथे चालक बसमध्ये नसतानाच अचानक बस चालू झाली आणि बस स्थानकासमोरील दोन दुकानांमध्ये थेट घुसली, यामध्ये दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. धक्कादायक म्हणजे त्यावेळेस बसमध्ये बसलेले दोन शाळेकरी विद्यार्थी (Student)झाले जखमी.

जखमी विद्यार्थ्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांकडून खोडसाळपणा झाल्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून नवापूर बस स्थानकात नेमका हा अपघात कसा घडला या संदर्भात डेपो मधील डेपो मॅनेजर आणि कंट्रोल मधील कर्मचारी काहीही बोलायला तयार नाही

सध्या संपूर्ण घटनेचा हा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्राम या सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''बस घुसली दुकानात,मोठा अनर्थ टळला'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स मिळालेले आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT