Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : पर्यटक तरुणांची अमरावतीच्या चिखलदऱ्यात हुल्लडबाजी; दरीजवळ जीवघेणी स्टंटबाजी Video व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर अमरावतीमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये काही तरुण जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या मुंबईसह प्रत्येक शहरात मुसळधार पावसाळा सुरुवात झालेली आहे. पावसासंबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कधी पावसाचा आनंद घेत असताना पर्यटक असतात,तर पावसाच्या पाण्यात जीवघेणी स्टंटबाजी करतानाचे काही पर्यटक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे,ज्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, चांगले फोटो काढण्याच्या नादात काही तरुण स्वता:चा जीव धोक्यात घालत आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

सोशल मीडियावर(Media) लाईक्स तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींच्या चांगल्या कमेंट्स मिळवण्यात सध्या तरुणामध्ये वेड सुरु आहे. जणू काही स्पर्धाच. याच स्पर्धेच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊन रील बनवणे तसचे फोटो काढणे हे सतत सुरु असल्याचे आपण पाहू शकतो.मात्र याच सर्व गोष्टीपायी तरुणाई नको त्या थराला जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहिल्यानंतर ही तुम्हाला असेच वाटेल. मात्र नक्की घडल तर काय असे या व्हिडिओत?

पाहा व्हिडिओ

तरूणांकडून दरीजवळ हुल्लडबाजी

सोशल मीडियावर संपूर्ण व्हिडिओ (Video)व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ३ तरुण एका धोकादायक दरीजवळच्या असलेल्या कड्याजवळ दिसून येत आहेत. याच कड्याजवळ एक मोठा दगड आहे. यांच्यापैंकी एक तरुण कड्याजवळ असलेल्या एका धोकादायक दगडावर जाऊन उभा राहतो आणि दुसरा तरुण त्याआधीच्या तरुणाचा फोटो काढत आहे.

एवढेच नव्हे तर उंच दरी (vally)असल्याने वाराही जोरात वाहत आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे चुकूनही दगड निसटला असता तर तो तरुण थेट खाली पडला असता आणि त्याचा जागीच अंत झाला असता. ऐवढेच नाही व्हिडिओ जसा जसा पुढे जातो तसे आपल्याला अनेक तरुण दरीच्या कड्यावर सेल्फी घेतानाही दिसत आहेत.

या तरुणांचा व्हिडिओ अमरावती जिल्ह्यातील असलेल्या चिखलदरा या पर्यटन(tourism) स्थळाचा आहे. तरुणांचा सर्व प्रकार तेथील असलेल्या एका पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई शहरातील एक रिल स्टारचाही रील व्हिडिओ बनवताना एका दरीच्या कड्यावरुन तोल जाऊन दूर्देवी मृत्यू झाला आहे. याआधीही रील तसेच सेल्फी घेण्याच्या नादात अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तरी असे प्रकार तरुणांकडून थांबण्याचे नाव घेत नाही.परंतू हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यांच्यावर कोणती कारवाई करतील का असा प्रश्न नेटकरी वर्गातून विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत उघडा जॉइंट खातं अन् महिन्याला कमवा ₹8,633 रुपये

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT