Coffee Maggie Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Maggie Viral Video: टोमॅटो आणि कॉफी टाकून बनवली मॅगी; विचित्र रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल

Coffee Maggie Viral Video: सोशल मीडियावर स्ट्रीट फूड व्लॉग वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतात. यात वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ असतात. एका स्ट्रीट फू़ड विक्रेत्याने चक्क कॉफी टाकून मॅगी बनवली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ हे खाद्यपदार्थांचे असतात. अनेक फूड व्लॉगर स्ट्रीट फूडचे व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. त्यात अनेकदा मॅगी, मिल्कशेक, डोसा या पदार्थांचे व्हिडिओ असतात.

सोशल मीडियावर मॅगीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कोलड्रिंक मॅगी, रसना मॅगी , चॉक्लेट मॅगी असे वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळाले आहेत. परंतु तुम्ही कधी दूधवाली मॅगी पाहिली आहे का? सोशल मीडियावर सध्या दूध आणि कॉफी मॅगीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने कॉफी असलेली मॅगी बनवली आहे. त्यात मॅगी विक्रेता सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध टाकतो. त्यानंतर त्यात मॅगी टाकतो. त्यावर टॉमेटो आणि मॅगी मसाला टाकून मिक्स करतो. यानंतर त्यात कॉफी पावडर टाकतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करु घेतो. त्यानंतर त्यात हळद, मिरची पावडर टाकून शिजवून घेतो. त्यानंतर ही मॅगी एका डिशमध्ये सर्व्ह करतो. मॅगीच्या या रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

hnvstreetfood या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'देव तुम्हाला माफ करणार नाही', 'ही मॅगी नव्हे तर विष आहे'. 'ही अशी मॅगी खाऊन लोक आजारी पडतील', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravan Dahan: वरुणाराजाच्या माऱ्यापुढे राक्षस राजाची हार; वादळी पावसानं उडवलं मुडकं, तर कुठं रावणनं घेतली झोप

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेत्याने धनुष्यबाण हाती घेणार

Delhi Police : प्रसिद्ध कलाकाराच्या हत्येचं षडयंत्र; रोहित गोदारा-गोल्डी बरार गँगच्या २ शुटरला राजधानीतून अटक

Dasara Melava: पाच वर्षाचा बाळ शिवसैनिक शिवतीर्थावर निष्ठा आणि उत्साहाची झळक दाखवतोय|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला पोहोचले

SCROLL FOR NEXT