Viral Video saam tv news
व्हायरल न्यूज

Viral Video: 'हा निव्वळ मूर्खपणा..',भटक्या कुत्र्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीतून तरुणाने सोडलं मोकाट; पहा VIDEO

Street Dog Viral Video: सध्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Biker Released The Dogs From The Van

सध्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना विशेष लहान मुलांना रस्त्यावर फिरणेदेखील कठीण झाले आहे. अनेकदा भटके कुत्रे रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात. त्यामुळे नागरिक भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्या प्रशासनाकडे करतात,त्यात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहत असून हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नक्की काय आहे असा प्रश्न पडला असेलच. या व्हायरल व्हिडिओत एक दुचाकीस्वार महानगरपालिकेच्या वाहनातील पिंजऱ्यातून काही कुत्र्यांना सोडवत आहे. त्यामुळेच त्या व्यक्तीने कुत्र्यांना महानगरपालिकेच्या वाहनातून मुक्तता केली ते चुकिचे केले का बरोबर हा प्रश्न उपस्थित राहत आहे. व्हिडिओ आग्रायेथील असल्याचे समजले जात असून तेथीलच आहे हे नक्की नाही.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन महानगरपालिकेचे वाहन काही कुत्र्यांना बंदिस्त करुन घेऊन जाताना दिसत आहे. कुत्र्यांना त्या वाहनतील पाढच्या बाजूस असलेल्या एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवलेले आहे त्यातच काही वेळानंतरच तिथे एक दुचाकीस्वार येतो आणि कुत्र्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो. पिंजऱ्याचा दरवाजा उघडताच धावत्या वाहनातून काही कुत्रे खाली उतरु लागतात आणि तेथून पळ काढतात.

सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील@imayankindianया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नागंरिकांनी दुचाकीस्वारावर संताप व्यक्त केला आहे तर काहींनी गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून प्रचंड लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT