Virar Stray Dog : विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा वृद्धावर जिवघेणा हल्ला, वसई-विरारमध्ये दहशत

Virar Stray Dog News : वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची दहशत वाढली असून गुरुवारी (ता. २२) पहाटे विरार पश्‍चिमेतील भटक्या कुत्र्यांनी ८३ वर्षीय वृद्धावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
Virar Stray Dog
Virar Stray Dog Saam Digital
Published On

Virar Stray Dog

वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची दहशत वाढली असून गुरुवारी (ता. २२) पहाटे विरार पश्‍चिमेतील भटक्या कुत्र्यांनी ८३ वर्षीय वृद्धावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी वसईमध्ये एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता.

गुरुवारी विरार पश्‍चिमेतील आगाशी येथील कोल्हापूर गावात पहाटे फिरण्यासाठी आलेल्या सायमन मिनेज (८३) यांच्यावर परिसरातील भटक्या कत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नालासोपाऱ्यातील तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा विषय वसई-विरारमध्ये ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघातातही वाढ झाली आहे. भटके कुत्रे वाहनचालकांच्या मागे लागत असल्याने अनेकदा वाहन चालकांचादेखील यामुळे अपघात झालेला आहे. प्रशासनाने यावर लक्ष देत नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Virar Stray Dog
Ravindra Dhangekar: पुण्यात अनेक ललित पाटील; ड्रग्स प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट.. आमदार रविंद्र धंगेकरांचे गंभीर आरोप

बिबट्याला लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य होऊन बसले माजी सरपंच

मंचरचे (Manchar) माजी सरपंच दत्ता गांजळे हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेल्या चार दिवसांपासुन अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासनासह राजकीय नेत्यानी आंदोलनाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच दत्ता गंजाळे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंज-यात स्वतला कैद करुन घेतले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार असाल तर मी स्वतःला बिबट्याच्या स्वाधीन करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दत्ता गांजळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन, तसेच वनविभाग अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Virar Stray Dog
Lonavala News : लोणावळा टायगर पॉईंटवरुन पडून २१ वर्षीय इंजिनीअरिंगच्या तरुणीचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com