शाळा आणि कॉलेजचे दिवस हे सर्वांच्या आयुष्यातील खूप सुंदर असतात. शाळा आणि कॉलेजच्या दिवसात आपण सर्वजण खूप मज्जा, मस्ती करतो. शाळेत शेवटच्या बाकावर बसून लेक्चरमध्ये मज्जा मस्ती करतो, तसेच खाऊचा डब्ब हळूच उघडून खातो. यामुळे कधीकधी शिक्षण ओरडतात. परंतु शाळेतील ही मज्जा काही वेगळीच असते. असाच एक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Backbencher Viral Video)
व्हायरल व्हिडिओत कॉलेजच्या मुलांनी शेवटच्या बाकावर बसून भेळ बनवली आहे. कॉलेजमध्ये शिक्षक समोर असताना मागे बसून भेळ बनवत आहे. कॉलेजमधील ४-५ मुलांचा ग्रुप भेळ बनवताना दिसत आहे. त्यातील एक जण कांदा कापताना दिसत आहे तर एकजण टॉमेटो कापताना दिसत आहे. एका मुलाने कांदा कापण्याच्या भांड्यात सर्व पदार्थ मिक्स करुन कापताना दिसत आहे.
यानंतर मुले त्यांच्या डब्ब्यात भेळ घेताना दिसत आहे. भेळ घेतल्यानंतर त्यात कांदा-टॉमेटो टाकून सर्व मिक्स करताना दिसत आहे.त्यानंतर सर्वजण मागच्या बाकावर बसून भेळ खाताना दिसत आहे. समोर शिक्षक शिकवत असताना मागे बसून भेळ खाण्याची मज्जा काही वेगळीच असते, अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. (Viral Video)
Rosy या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर Backbencher Pro Max असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शाळा आणि कॉलेजमधील दिवस म्हणजे सुख.हे असं फक्त कॉलेजमध्ये करता येत होतं, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. (College Students Viral Video)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.