Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबई लोकलमध्ये संगीतमय प्रवास; तरुणाच्या आवाजाने सर्वांनाच पडली भुरळ; व्हायरल VIDEO पाहा

Mumbai Local Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत तरुणाने एक गाणं गायल आहे. जो गाण्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला आहे.

Tanvi Pol

Mumbai Viral Video: गेल्या काही वर्षात मुंबई लोकल ट्रेन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. दर सेंकदाला प्रवाशी भरलेल्या या लोकल ट्रेनमधील विविध प्रसंगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एका तरुणाने उत्तम असे गाणे गायले आहे.

व्हिडिओत खास असे तरी काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लोकल ट्रेन(Local Train) दिसत आहे, मात्र ही लोकल ट्रेन दुसऱ्या कोणत्या शहरातील नसून मुंबई शहरातील आहे. व्हिडिओत पुढे तुम्हाला पुरुष कंपार्टमेंट दिसत आहे, ज्यात पुरुष प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून त्यात एक तरुण एका जागी उभा राहून ,''दे बाई दे जोगवा दे । आई अंबेचा जोगवा दे'' हे गीत गात आहे. एका बाजूला तरुण गात आहे तर सीटवर बसलेले अनेक पुरुष टाळ वाजवत त्याला गाण्यात सात देत आहे, अशा पद्धतीने सर्वांच्या साथीने उत्तम रित्या गाणे प्रत्येकाला आवडलेले आहे.

व्हिडिओ कुठे पाहता येईल ?

मुंबई लोकल ट्रेनचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टावरील ''avinash_ambre_official_007'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये,''दे बाई दे जोगवा दे । आई अंबेचा जोगवा दे'' असे गाण्याचे बोल लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ५१ हजारहून अधिक लाईक्स तर मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

तरुणाचे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतील आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओतील गाणे ऐकून अनेकांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''खूप छान'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''भावा तुझा आवाज आणि हास्य खुपच गोड आहे'', अशा प्रकारे बऱ्याच यूजर्संनी तरुणाच्या गाण्याचे आणि आवाजाचे कौतुक केले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार संसदेत मांडणार नवीन कठोर कायदा

राहुल गांधींच्या भूमिकेनं अधिवेशन वादळी ठरणार? सीजेपीनंतर विरोधक संसद गाजवणार?

Police Officer Transfer: 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलीस विभागात मोठा फेरबदल

युवा मतदार बदलणार निवडणुकांचं समीकरण; निवडणुकांची दोरी 'Gen Z'च्या हाती

रक्षकच बनला भक्षक, पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT