Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक! बीडमध्ये अधिकाऱ्याला जमावाकडून मारहाण; घटना कॅमेऱ्यात कैद

Beed Windmill News: सोशल मीडियावर सध्या बीड येथे घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायल होत आहे, ज्यात पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यास जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे.

Tanvi Pol

Fighting Video: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यात काही जमावाने काठी आणि लाथा बुक्क्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केलीय. तर या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून आता याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमके काय घडले?

बीड (Beed)येथील मस्साजोग येथे अवादा एनर्जी नावाच्या पवनचक्की प्रकल्पाचे कार्यालय आहे. शुक्रवारी या कार्यालयात आरोपी अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले सर्व रा. टाकळी ता. केज आणि इतर अनोळखी १ व्यक्ती अशा चौघांनी अगोदर अनाधिकृतपणे कंपनीच्या गेटमधुन प्रवेश केला. त्यानंतर त्याठिकाणी हजर असलेले कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ व धमकी (threat)दिली आणि लाथा, काठी व बुक्क्यांनी त्यांच्या पाठीवर, डोक्यात मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान या प्रकरणी शिवाजी थोपटे यांच्या तक्रारीवरून बीडच्या केज पोलीस ठाण्यात अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरुद्ध अनेक कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमधील घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील''SaamTvNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असून अशा अनेक घटनांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया

व्हिडिओत पाहून बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अशा कारणामुळे महाराष्ट्रात सुधारणा होत नाही आणि ही आपली लोकं असे करतात'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''जेल मध्ये टाकावं अस मला वाटत या लोक आहेत'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले,''लोकांना जेल मधे टाका'',अशा संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

Surya Gochar: जानेवारीत सूर्य ग्रह करणार २ वेळा गोचर; 'या' राशींना लागणार जॅकपॉट, मिळणार भरपूर पैसा

Women Cricket History: भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या इतिहास

Silver Price: इतिहासात पहिल्यांदाच चांदी २ लाखांच्या पार, सोनं महागलं, आता पुढे काय?

कल्याणमध्ये अपघाताचा थरार; बायकोला कामावरून घरी आणताना विपरीत घडलं, दुचाकीस्वार नवऱ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT