चहा आणि कॉफी हा भारतीयांच्या आवडीचा विषय. भारतात सर्वांनाच चहा- कॉफी आवडतात. अनेक रस्त्यांवर चहा कॉफीचे स्टॉल असतात. प्रत्येक व्यक्ती फ्रेश होण्यासाठी चहा किंवा कॉफी घेतोच. चहा-कॉफीमध्ये अनेक प्रकार असतात. अनेक वेगवेगळे फ्लेवर्स असतात. तसेच अनेकांना स्ट्रॉंग कॉफी, फिल्टर कॉफी आवडते. परंतु तुम्ही कधी प्रेशर कुकरमध्ये बनवलेली कॉफी प्यायली आहे का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक कॉफीविक्रेता चक्क प्रेशर कुकरच्या मदतीने कॉफी बनवताना दिसत आहे. कॉफी बनवण्यासाठी त्याने हे अनोखे तंत्र वापरले आहे. व्हायरल व्हिडिओत कॉफी बनवणारा व्यक्ती सर्वप्रथम एक स्टीलच्या कपमध्ये गरम दूध घेतो. त्यात साखर आणि कॉफी टाकतो. त्यानंतर हा कप प्रेशर कुकरच्या जवळ नेतो. प्रेशर कुकरला एक अनोख्या आकाराता पाईप बसवण्यात आलेला दिसत आहे. हा नळाच्या आकाराचा पाईप असल्याचे दिसत आहे. हा पाइप कुकरच्या शिट्टीजवळ आहे. त्यातून वाफ निघत आहे. यानंतर कपातील कॉफीत पाइप बुडवतो. त्यानंतर कॉफी तयार होऊन येते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कॉफी विकणारा व्यक्ती त्या प्रेशर कुकरला जोडल्या गेलेल्या पाइपच्या माध्यमातून कॉफी व्यवस्थित मिक्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या कॉफीची चव ग्राहकांना खूप आवडलेली दिसत आहे. कॉफी विकणाऱ्याची ही अनोखी कल्पना नेटकऱ्यांनी खूप आवडलेली दिसत आहे.
india_food_hustle या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अतरंगी प्रेशर कुकरवाली कॉफी, ब्रँडेड कॉफीपेक्षाही भारी, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांना कॉफी बनवण्याची ही अनोखी पद्धत खूप आवडलेली दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.