Stray Dogs Attack Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : तरुणाचा जीव वाचवण्यासाठी भटक्या कुत्र्याशी महिला भिडली; थरकाप उडवणारा व्हिडिओ

Viral News: रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा भटके कुत्रे रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात. असाच हल्ला भटक्या कुत्र्याने एका व्यक्तीवर केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Stray Dogs Attack On Man Viral Video:

रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरुन फिरणेदेखील कठीण झाले आहे. अनेकदा भटके कुत्रे रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात. असाच हल्ला भटक्या कुत्र्याने एका व्यक्तीवर केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत कुत्र्याने एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तो व्यक्ती जखमी झाला आहे. एक व्यक्ती दुकानातून काहीतरी सामान खरेदी करुन बाहेर येताना दिसत आहे. त्यावेळी त्याच्यावर भटके कुत्रे हल्ला करतात. कुत्रा त्या व्यक्तीच्या पायाचा चावा घेताना दिसत आहे. यावेळी या व्यक्तीला वाचवायला एक महिला धावून येते. ही महिला कुत्र्याला मारते आणि त्याला तिकडून पळवण्याचा प्रयत्न करते. परंतु कुत्रा त्या व्यक्तीला सोडतच नाही. त्यानंतर आजूबाजूचे इतर लोक येतात आणि कुत्र्याला पळवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळाने कुत्रा तिथून निघून जातो. या हल्ल्यात तरुणाच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणेदेखील खूप धोक्याचे झाले आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे. अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातले सर्वाच पहिले धान्य कोणते? जाणून घ्या रोचक माहिती

Lalbaug Visarjan 2025 : लालबाग राजाच्या विसर्जनाला विघ्न, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Heart-Touching Video : बाप्पाला घरी घेऊन चला, पाण्यात सोडू नका, शिवण्याचा बाबाकडे हट्ट, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल

Lalit Prabhakar : 'आरपार'नंतर ललित प्रभाकर हिंदी चित्रपटात झळकणार, सिनेमाचे नाव काय?

SCROLL FOR NEXT