Stunt Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Stunt Video: कारच्या टपावर चढून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; VIDEO व्हायरल; पोलिसांची वायुवेगानं कारवाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकजण स्टंटबाजी करताना दिसतात. बाईकवरुन जाताना वेगवेगळे स्टंट करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा तर प्रेमवीर बाईकवरुन जाताना अश्लील कृत्य करताना दिसतात. अनेकदा दोन्ही हात सोडून बाईक चालवतानाचेदेखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका कारचालकाचा स्टंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक कारचालक चालत्या कारमधून बाहेर येऊन चक्क कारच्या टपावर उभा असलेला दिसत आहे. चालत्या कारमधून कारचालक बाहेर येतो आणि टपावर चढतो आणि कारवर चालताना दिसत आहे. ती कार तशीच पुढे चालताना दिसत आहे. धावत्या कारमधून बाहेर येऊन हा असा स्टंट करणे जीवावर बेतू शकतो. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

@Siya1708200 या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ राजस्थानमधील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लगेचच मुंबई पोलिस आणि झालावाड पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'हे स्टंट करणे जीवावर बेतू शकते'. 'स्टंटबाजी करताना कुठे करावी याचा तरी विचार करावा', 'या व्यक्तींमुळे अपघाताची संख्या वाढत आहे', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT