Bulls Attack On Rickshaw Driver Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: नसती उठाठेव आली अंगलट! झुंज सोडवायला गेला; बैलांनी चालकासकट रिक्षा पलटी केली... भयानक व्हिडिओ

Bulls Attack On Rickshaw Driver: खवळलेले बैल चालकासकट रिक्षा पलटी करतात, ज्यामुळे तो रिक्षाचालक चांगलाच जखमी होतो

Gangappa Pujari

Viral Video News: सोशल मीडिया हा असंख्य व्हिडिओंचा खजाना आहे. सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भीषण अपघाताचे तर भन्नाट डान्सचे हे व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या असाच एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन बैलांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

काय आहे व्हिडिओ?

रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात (Accident) झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा मोकाट कुत्र्यांनी, प्राण्यांनी हल्ला केल्याच्याही घडल्या आहेत. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन बैलांच्या भांडणात रिक्षा चालकाच्या चांगलेच जिवाशी बेतल्याचे दिसत आहे.

दोन बैल रस्त्याच्या मधोमध झुंजताना दिसत आहेत. हे भांडण सोडवण्यासाठी तो रिक्षावाला त्याची रिक्षा दोन्ही बैलांच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतो. मात्र खवळलेले बैल चालकासकट रिक्षा पलटी करतात, ज्यामुळे तो रिक्षाचालक चांगलाच जखमी होतो.

बैलांनी केली रिक्षा पलटी...

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एका गजबलेल्या बाजारपेठेतील भररस्त्यात दोन बैल झुंजताना दिसत आहेत. आसपासचे लोक काठ्या घेवून नाना प्रकारे हे भांडण सोडवण्याचा आणि बैलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र खवळलेले बैल कोणालाही जुमानत नाहीत.

अशातच एका रिक्षाचालकाला बैलांना हाकलण्याची कल्पना सुचते. तो त्याची रिक्षा रिव्हर्स घेत दोन्ही बैलांच्या भांडणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. रिक्षा चालकाच्या प्रयत्नाप्रमाणे दोन्ही बैल वेगळे होतात, मात्र त्यानंतर एक बैल थेट रिक्षाला धडक देतो. ज्यामुळे रिक्षा चालकासह उलटते. रिक्षाच्या अपघातानंतर बैल तिथून पळून जातात. आजूबाजूला उभी असलेली माणसे रिक्षाचालकाच्या मदतीला जातात.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी नसत्या उठाठेव कशाला करायच्या असा सल्ला रिक्षाचालकाला दिला आहे, तर काही जणांनी शिकार खुद शिकार हो गया असे म्हणत रिक्षाचालकाची खिल्ली उडवली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT