pregnant monkey drinks alcohol at liquor shop in Ranchi Saam tv marathi
व्हायरल न्यूज

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Monkey drinks alcohol : दारूच्या दुकानात एका माकडीणीने प्रवेश करून बाटली फोडली आणि दारू प्यायल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर ती दुकानातील खोक्यांवर झोपल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Namdeo Kumbhar

pregnant monkey drinks alcohol at liquor shop in Ranchi : माकडाने दारू प्यायलेली तुम्ही कधी पाहिलं अथवा ऐकलं आहे का? नाही ना. पण रांचीतील प्रकार पाहून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. झारखंडची राजधानी रांचीजवळील ओरमांझी भागात एक अजब आणि मजेशीर प्रकार घडला. एका गर्भवती माकडीणीने थेट दारूच्या दुकानातच एंट्री मारली आणि तिथे ठेवलेली दारू पिऊन मस्त ताणून दिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की काय घडलं?

दुकानात अचानक आलेल्या माकडीणीला पाहून तिथे असलेले कर्मचारी आणि ग्राहक आधी थोडे घाबरले. दुकानातील कर्मचाऱ्याने तिला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला हलकासा चावा घेतला, ज्यामुळे तो मागे हटला. त्यानंतर तिने दुकानात ठेवलेली दारूची बॉटल उचलली आणि काही घोट दारू प्राशन केली.

मस्तपैकी घेतली झोप

दारू प्यायल्यानंतर लगेचच तिला चांगलीच नशा चढली. कोणतीही गडबड किंवा गोंधळ न घालता ती दुकानदाराच्या खोक्यांवर अत्यंत शांतपणे ताणून देऊन झोपून गेली. एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून या कमेंट्स अन् लाईक्सचा पाऊस पडत आहे.

पुढे काय झाले?

व्हिडीओ काढणारी व्यक्ती जवळ आल्यावर ती क्षणभर डोळे उघडते आणि लगेचच पुन्हा मिटवून घेत असल्याचे दिसतेय.दारूच्या नशेत असलेल्या माकडीणीला पाहण्यासाठी दुकानाबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली होती. दुकानात दारू पिऊन झोपलेल्या या माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. घटनेची माहिती मिळताच प्राणी बचाव पथक (Rescue Team) घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माकडीणीला कोणतीही दुखापत न पोहोचवता तिथून सुरक्षितपणे बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात सुरू, तरी टँकरने BRT डिव्हायडर धुतले! नागरिकांचा संताप

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

Retirement news: 17 वर्षांची कारकिर्द, वनडेत 2 हजारांपेक्षा जास्त रन्स...! भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा

दिपकेंनंतर दिल्ली पोलिसांनी नेहा बोरालाही घेतलं ताब्यात; कनॉट प्लेसवर आंदोलकांची तुफान गर्दी

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निळं आकाश आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी 'या' 5 पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT