Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: हुडहुडी थंडीपासून बचावासाठी थेट ट्रेनमध्येच पेटवली शेकोटी! घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Train Viral Video: एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चक्क थंडीपासून बचाव करण्यासाठी काही व्यक्तींनी ट्रेनच्या डब्ब्यात शेकोटी पेटवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bonfire In Ac Coach

राज्यभर थंडीची लाट पसरली असून प्रत्येकजण शेकोट्या पेटवत आहेत. थंडीपासून बचाव होण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळा उपाय करत असतात. अनेकवेळा थंडीपासून स्वता:चे संरक्षण करण्यासाठी केलेले उपाय प्राणघातक ठरलेले आहेत.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चक्क थंडीपासून बचाव करण्यासाठी काही व्यक्तींनी ट्रेनच्या डब्ब्यात शेकोटी पेटवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, ट्रेनच्या डब्ब्यात दोन व्यक्ती शेकोटी पेटवून शेकोटी घेताना दिसत आहेत. दरम्यान शेकोटीची आग जळत असल्याचे पाहून एक व्यक्ती तिथे येथे आणि तो ही शेकोटी घेऊ लागतो. शेकोटीमुळे एक्सप्रेसमधील डबा धुराने भरल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील शेकोटी पेटवल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडिओ मेरठहून प्रयागराजला जाणाऱ्या संगम एक्सप्रेसमधील आहे. हा धक्कादायक प्रकार ट्रेनमधील सहप्रवाशांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. विशेष म्हणजे जीआपीचे पथक तिथे पोहचताच शेकोटी पेटवणारे व्यक्ती तिथून फरार झाले. याआधीही घराबाहेर शेकोटी घेत असताना शेकोटीचा स्फोच झाल्याचा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला होता.

व्हायरल व्हिडिओ एक्स अॅपवरील(ट्वीटर)@Benarasiyaaया पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या व्हायर व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले असून हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळालेत. अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी 'हे' १ काम करा, रंगाचा डागही पडणार नाही अन् चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Salim Khan: सलीम खान यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले अमिताभ बच्चन अन् जावेद अख्तर; व्हायरल फोटचं नेमकं सत्य काय?

Viral Video: जवळ गेला, मुलीच्या कपड्यांना हात लावला आणि...! भर रस्त्यात तरूणाने मुलीची काढली छेड; व्हिडीओ व्हायरल

Raj Thackeray : 'सुख पाहता...' राज ठाकरेंनी सांगितली ३७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण, पोस्टमधून दिसली ती तळमळ

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात शिवसेना नगरसेवकांकडून गोंधळ

SCROLL FOR NEXT