Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Video: डान्स करताना अचानक स्कर्टचं बटन तुटलं, तरी ती नाचतच राहिली; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Dance Video Viral: स्टेजवर डान्स करताना मुलीच्या स्कर्टची पिन सैल झाली. मात्र घाबरून न जाता तिने आत्मविश्वासाने डान्स सुरू ठेवला. तिच्या धैर्याने व आत्मविश्वासाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Manasvi Choudhary

इंटरनेटवर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यात डान्स म्हटलं की अनेकांच्या आवडीचा छंद. महिला असो पुरूष अगदी मनमोकळेपणाने तालासुरात नाचताना तुम्हीदेखील पाहिलच असेल. याचे मजेशीर व्हिडीओ देखील सोशल मीडियावर दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेत आहे. त्यात एका मुलीने अत्यंत जबरदस्त डान्स केला आहे. मात्र डान्स करतानाच या मुलीसोबत जे घडतय ते भयंकर आहे. तरी देखील मुलीने स्वत:वरच्या आत्मविश्वासाने हे डान्स पूर्ण केला आहे.

एक मुलगी स्टेजवर 'आझाद' चित्रपटातील 'ओये अम्मा' या गाण्यावर डान्स करत आहे. डान्स करताना मात्र अचानक या मुलीच्या स्कर्टची पिन सैल होते. हे मुलीच्या लक्षात येताच ही मुलगी सुंदर पद्धतीने कव्हर करत डान्स करत आहे जे पाहून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर लाल रंगाच्या स्कर्ट- टॉपवर मुलगी डान्स करत आहे. 'ओये अम्मा' या सुपरहिट गाण्यावर ही मुलगी डान्स करत आहे. अचानक डान्स करताना मुलीच्या स्कर्टची पिन सैल होते. मात्र मुलगी घाबरून न जाता हाताने स्कर्ट पकडते आणि डान्स सुरूच ठेवते. मुलीने एका हातात स्कर्ट पकडला आहे तर दुसऱ्या हाताने ती डान्स करत चेहऱ्यावरील एक्सप्रेशन देत आहे. या मुलीच्या आत्मविश्वासाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. मुलीच्या या धैर्याचे कौतुक होत आहे.

सोशल मिडिया इन्स्टाग्राम @gk_world_1000 या अकाउंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील समजलं असेल मुलीने डान्स करताना इतक्या सुंदरपणे तिचा ड्रेस सांभाळला आहे. जो पाहून कोणालाही वाटणार नाही की तिच्यासोबत असं काही घडलं आहे. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओ बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. नेटकऱ्यांनी मुलीच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: वीकेंडला कुठं जावं? शांत, सुंदर आणि निवांत…; नागपूरमधील 'ही' ठिकाणं पिकनिकसाठी एकदम परफेक्ट

Maharashtra Live News Update: पेट्रोल भरण्यावरून दो गटामध्ये तुफान हाणामारी, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur: 'सरकारने आमच्या समाजाचा घात केला', ओबीसी तरुणाची आत्महत्या, मांजरा नदीत मारली उडी

बायकोला इन्स्टा रिल्सचं वेड, नवऱ्याची सटकली; कुऱ्हाडीनं वार करत जागीच संपवलंं, लेकीलाही सोडलं नाही

Mumbai : मुंबईत भयंकर घडलं! सेना भवनासमोर वाहतूक पोलिसावर घातला ट्रक; Video

SCROLL FOR NEXT