Snake-bitten Vegetables 
व्हायरल न्यूज

Viral Video: तुम्ही खाताय सापाने चावलेल्या भाज्या? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Snake-bitten Vegetables: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात एक साप टोमॉटो आणि फ्लॉवर खाताना दिसत आहे. त्यामुळे बाजारात आलेल्या भाज्यांवर सापाने खाल्ल्या असतात का असा सवाल नेटकरी करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

हा व्हिडिओ पाहून तुम्ही टोमॅटो आणि फ्लॉवर खाणं सोडून द्याल. कारण, या व्हिडिओत शेतातील टोमॅटोला साप चावत असल्याचं दिसतंय. तर फ्लॉवरमध्ये सापाने वेटोळा घातलाय. हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय आणि त्यासोबत एक मेसेजही व्हायरल करण्यात आलाय. हा आरोग्याचा प्रश्न असल्याने आम्हीदेखील हा व्हिडिओ निरखून पाहिला आणि यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात

शेतातील टोमॅटोंना साप खातो आणि त्या टोमॅटोंना छिद्र पडलेले असतात.ते टोमॅटो तुम्ही खाल्लात तर जीवावर बेतू शकतं. तसंच फ्लॉवरमध्येही साप असू शकतात.भाजी घेताना स्वच्छ साफ करून घ्या.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. हा विषय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.तसंच लोकांच्या आरोग्याशीही संबंधित असल्याने यामागचं सत्य शोधण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली.याबाबत शेतकरी इत्यंभूत माहिती देऊ शकतात. त्यामुळे आमच्या टीमनं शेतकऱ्यांशी संपर्क साधला. त्यांची भेट घेतली आणि व्हिडिओ दाखवून यामागचं सत्य जाणून घेतलं.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

टोमॅटो हे सापाचे खाद्य नाही

साप फळभाजीपालाही खात नाही. सापानं चावल्यामुळे टोमॅटोला छिद्र पडत नाहीत

व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातेय.

चुकीचा मेसेजमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होतेय.

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने शेतकऱ्यांचंही नुकसान होतंय. शेतकऱ्यांचे टोमॅटो लोक खरेदी करत नाहीये.मात्र, हा व्हिडिओ व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय. साप टोमॅटो चावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली जातेय.मात्र, असं काहीही नसून आमच्या पडताळणीत साप टोमॅटो खात असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

SCROLL FOR NEXT