Government Office Fight Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सरकारी कार्यालयातच राडा; कंत्राटदारानं सरकारी कर्मचाऱ्याला केली मारहाण, VIDEO

Government Office Fight Video: उत्तर प्रदेशातील मैनपुरीच्या पीडब्ल्यूडी कार्यालयात कंत्राटदाराने वरिष्ठ लिपिकाला खुर्चीवरून खेचले व मारहाण केली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चक्क सरकारी कार्यालयातच दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. कामाच्या वेळेत या दोघांमध्ये मारामारी झाली. यातील एक व्यक्ती तर सरकारी कर्मचारी होता आणि दुसरा व्यक्ती कंत्राटदार होता. या दोघांमध्ये काही कारणांमुळे सुरुवातीला शा‍ब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारी झाली. जर सरकारी कार्यालयातच अशा प्रकारची हाणामारी होत असेल तर प्रशासनाच्या कामावर आता प्रश्न उपस्थित केले जातील.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील मैनपुरीतील पीडब्ल्यूडी कार्यालयात ही घटना घडली. बुधवारी दोन व्यक्तीमध्ये तुफान हाणामारी झाली. कार्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या क्लर्कसोबत मारामारी झाली आहे. पीडब्ल्यूडी कार्यालयात एका कंत्राटदाराने वरिष्ठ लिपिकाला खुर्चीवरून खेचले आणि मारहाण केली आहे. या दोघांमधील भांडण पाहून कार्यालयातील इतर कामगार घाबरले. त्यांनी या दोघांना वेगळे करत भांडणे मिटवली. या संपूर्ण प्रकरणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी कार्यालयातील वरिष्ठ क्लर्क हे बांधकाम विभागाच्या कार्यालयात काम करत होते. यावेळी तेथे एक कंत्राटदार आला आणि त्याने कामाचे बिल पेमेंटसाठी सादर केले का? असं विचारले. यावेळी वरिष्ठ लिपिक यांनी बिल तपासणीसाठी कनिष्ठ अभियंताकडे पाठवले आहे असे सांगितले. दरम्यान हे ऐकताच कंत्राटदार संतापला आणि त्याने अपशब्द वापरत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

पुढे, त्याने वरिष्ठ लिपीकाला त्याच्या खुर्चीवरून खाली खेचले आणि कार्यालयातच मारायला सुरूवात केली. या दोघांची मारमारी पाहून इतर कामगार तेथे जमा झाले. त्यांनी या दोघांना वेगळे करत भांडणे मिटवले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून लवकरच यावर योग्य ती कारवाई होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

SCROLL FOR NEXT