Viral Tesla car video claiming to show ghosts on the screen turns out to be fake; Anis confirms no paranormal activity detected Saam Tv
व्हायरल न्यूज

टेस्लाच्या स्क्रीनवर दिसतात भुतं? टेस्लामध्ये खरंच रात्री भुतं दिसतात?

Fact Check: टेस्लाच्या कारमध्ये स्क्रीनवर भुतं दिसतात...हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...मात्र, आता एक व्हिडिओ समोर आलाय...त्यामध्ये तसा दावा करण्यात आलाय...पण, खरंच टेस्लाच्या स्क्रीनवर भुतं दिसतात का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

या व्हिडिओत बघा, ही टेस्ला कार आहे आणि याच कारमधील स्क्रीनवर अचानक भुतं दिसतात असा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय...या स्क्रीनवरही काही दृष्य दिसतात, आणि गायब होतात...पण, खरंच टेस्ला कारमध्ये स्क्रीनवर भुतं दिसतात का...? या व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का..? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...

टेस्ला कारची सध्या क्रेज आहे...महागडी कार असल्याने अनेकांना या कारबद्दल आकर्षण आहे...पण, खरंच टेस्लाच्या स्क्रीनवर भुतं दिसतात का...? नक्की हा प्रकार काय आहे...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला...त्यावेळी आमच्या पडताळणीत या कारमध्ये स्क्रीनवर अचानक भुत दिसत नसल्याचं स्पष्ट झालं...असे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने याची सत्यता पडताळणीसाठी आमच्या टीमने अंनिस कार्यकर्त्यांची भेट घेऊन अधिक माहिती जाणून घेतली...

टेस्लाच्या स्क्रीनवर भुतं दिसतात हा दावा खोटा

स्क्रीनवरील व्हिडिओ बनवण्यात आलाय

टेस्ला कारमधील व्हिडिओ हा प्रँक

जगात कुठेही भूत अस्तित्वात नाही

त्यामुळे असे व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील तर ते पुढे शेअर करू नका...दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात...जगात भूत अस्तित्त्वात नाही...अंनिसने तर भूत दाखवणाऱ्याला 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय...त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाईही होऊ शकते...आमच्या पडताळणीत टेस्लाच्या स्कीनवर भुतं दिसतात हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT