Viral video watermelon plastic layer saam tv
व्हायरल न्यूज

Viral video: कलिंगडाच्या सालीवरून निघालं काळं प्लास्टिक? व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ

Viral video watermelon plastic layer: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कलिंगडावर प्लास्टिकसारखा थर असल्याचा दावा करण्यात आलाय. या घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जातेय.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. सध्या गरमीच्या दिवसात शरीर थंड राहावं म्हणून आपण गारेगार कलिंगड खाण्याचा विचार करतो. असाच सध्या एका व्यक्तीने कलिंकड घेतल्यानंतर त्याच्यासोबक कसा स्कॅम झाला याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. सध्या गरमीच्या दिवसात शरीर थंड राहावं म्हणून आपण गारेगार कलिंगड खाण्याचा विचार करतो. असाच सध्या एका व्यक्तीने कलिंकड घेतल्यानंतर त्याच्यासोबक कसा स्कॅम झाला याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये बाजारातून आणलेल्या कलिंगडवर काळी प्लास्टिकसारखी परत निघत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येतायत.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सांगतोय की, त्याने संध्याकाळी बाजारातून कलिंगड घेतलं आणि ते फ्रिजमध्ये ठेवलं. काही वेळानंतर जेव्हा त्याने ते खाण्यासाठी बाहेर काढलं तेव्हा त्याच्या सालीवरून काळ्या प्लास्टिकसारखी परत निघताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर करत 'आपण नेमकं काय खातोय? कोणावर विश्वास ठेवायचा?' असा सवाल उपस्थित केला आहे.

अधिकृत माहिती नाही

हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, 'हे खूप धोकादायक आहे. जर फळांवर प्लास्टिकसारखी परत असेल तर बाजारातील कोणत्याही वस्तूवर विश्वास ठेवता येणार नाही.' तर दुसऱ्या युजरने कमेंट केलीये, अन्नपदार्थांबाबत कोणतेही नियम उरलेले नाहीत.

फळांना लवकर पिकवण्यासाठी किंवा ती ताजी दिसण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. अशा प्रक्रियांमुळे फळांच्या बाहेरील पृष्ठभागावर एक थर तयार होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये दाखवलेली घटना खरोखरच केमिकलमुळे घडलीये याची तपासणी केली पाहिजे.

दरम्यान अन्नसुरक्षा विभागाने अशा प्रकारच्या व्हायरल व्हिडिओंची सत्यता तपासणं आणि आवश्यक ती कारवाई करणं गरजेचं असल्याची मागणी नागरिकांकडून होतेय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतंय.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT