Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! तरुणीच्या बुटातून निघाली भली मोठी गोम...; पुढे जे घडलं ते भयंकरच

Centipede In Shoe: पायात बूट घालण्याआधी तिला बुटात काहीतरी हालचाल जाणवते. त्यामुळे ती नीट पाहते तेव्हा बुटतील एक कोपऱ्यात मोठी गोम लपलेली दिसते. हे पाहून तरुणी देखील घाबरते.

Ruchika Jadhav

Centipede Viral Video:

ऋतू प्रमाणे जमिनीत दडलेले कीटक बाहेर येत असतात. या काळात तुम्ही गावात किंवा जंगल परिसराच्या आसपास राहत असाल तर प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. कारण आजूबाजूला अनेक किटक आणि सरपटणारे प्राणी असतात. अशात सोशल मीडियावर एक काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणीच्या बुटामध्ये भली मोठी गोम शिरली आहे. पायात बूट घालण्याआधी तिला बुटात काहीतरी हालचाल जाणवते. त्यामुळे ती नीट पाहते तेव्हा बुटातील एक कोपऱ्यात मोठी गोम लपलेली दिसते. हे पाहून तरुणी देखील घाबरते.

एका चीमट्याच्या साहाय्याने तिने ही गोम बाहेर काढली आहे. गोम बाहेर काढताच ती झाडांमध्ये तिला फेकून देते. तरुणीने नीट लक्ष दिले नसते तर गोम तिच्या पायावर आली असती आणि चावा देखील घेतला असता. मात्र वेळीच तिचं लक्ष गेल्याने येणाऱ्या संकटाला तिला टाळता आलं आहे.

तरुणीने तिला आलेला अनुभव इतर व्यक्तींशी शेअर केला आहे. जंगल किंवा गावा सारख्या ठिकाणी अशा घटना जास्त घडतात. त्यामुळे प्रत्येकाने पायात बुट घालताना त्यात काही लपलेलं तर नाही ना हे पाहून घ्यावं. अनेकदा बुटांमध्ये खोलगट जागा असल्याने यात काही कीटक किंवा सरपटणारे प्राणी देखील जाऊन बसतात.

काही दिवसांपूर्वी असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता. त्या व्हिडिओमध्ये तर चक्क एका सापाचं पिल्लू लपून बसलं होतं. बुटातून साप बाहेर काढतानाचा व्हिडिओ देखील त्या व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला होता. तो व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT