Viral Accident Video: पावसाचे पाणी उडवण्याचा मोह नडला... सुसाट कार गरकन फिरली अन् ३- ४ वेळा उलटली Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: पावसाचे पाणी उडवण्याचा मोह नडला! सुसाट कार गरकन फिरली अन् ३- ४ वेळा उलटली; भीषण अपघाताचा VIDEO

Accident Video: चित्रपट कथेत दाखवल्याप्रमाणे ही कार पलटी होण्याची दृश्ये व्हिडिओमध्ये दिसत आहेत, जो पाहून अंगावर काटा उभा राहतो.

Gangappa Pujari

Trending Accident Video: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे वाहने चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसामुळे गाड्या घसरण्याचा, खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याच्या सुचना दिल्या जातात.

मात्र असे असले तरी वाहनचालकांकडून अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. त्यामुळे भीषण अपघात होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाहन चालवताना मस्ती आणि अतिवेग कसा जीवावर बेतू शकतो, हेच या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Viral Video News In Marathi)

पावसामुळे अपघात...

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने (Rain Update) हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक भीषण अपघाताच्या (Accident) दुर्घटनाही समोर येत आहेत. अनेक भागात पाणी साचल्याने रस्तेही पाण्याखाली गेले आहेत, अशावेळी वाहन चालकांना सतर्क राहून प्रवास करण्याचे आवाहन केले जाते.

व्हिडिओ व्हायरल..

मात्र अनेकदा वाहन चालक मुद्दाम हलगर्जीपणा करत नको ते धाडस करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे अपघातही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये साचलेल्या पाण्यातून भरधाव वेगाने कार वाहने चांगलेच महागात पडले आहे.

पाणी उडवण्याचा मोह नडला...

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की; एका रस्त्यावर पाणी साचले आहे. त्या साचलेल्या पाण्यातून वेगाने कार घेवून जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार इतक्या वेगाने येते की साचलेले पाणी दोन्ही बाजूंनी वरपर्यंत उडाले. मात्र यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भरकटते.

३/ ४ वेळा उलटली कार...

पाण्यात कार गरकन फिरल्याने चालकाचे नियंत्रण सुटते आणि रस्ता सोडून थेट खाली जंगलात जावून उलटते. धक्कादायक म्हणजे जंगलात कार ३ ते ४ वेळा पलटी होते, ज्यामुळे भीषण अपघात होतो. एखाद्या चित्रपट कथेत दाखवल्याप्रमाणे ही कार पलटी होण्याची दृश्ये व्हिडिओमध्ये दिसत आहेत, जो पाहून अंगावर काटा उभा राहतो.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नको ते स्टंट करणाऱ्या चालकाला खडेबोल सुनावले आहेत तर काही जणांनी पावसाळ्यात असे स्टंट करुन जीव धोक्यात न घालण्याचा सल्लाही दिला आहे. आत्तापर्यंत . व्हिडीओला 3 लाखांहून अधिक लाईक्स आल्या असून अनेकांनी कार चालकाची चूक असल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT