Aasam Rhino Chasing Biker Crushed google
व्हायरल न्यूज

Viral Video: गेंडा पिसाळला; पाठलाग करत दुचाकीस्वाराला चिरडलं; शेतात सापडलं बाईककरचं डोकं, Live Video

Viral Video: दुचाकीस्वाराच्या मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका गेंडयाने त्याचा पाठलाग करून त्याचे डोके ठेचले. आजूबाजूच्या लोकांनी गेंडयाला हुसकावून लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने माणसाचा पाठलाग करत त्या व्यक्तीला चिरडलं.

Bharat Jadhav

दुचाकीस्वाराच्या मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका गेंडयाने त्याचा पाठलाग करून त्याचे डोके ठेचले. आजूबाजूच्या लोकांनी गेंडयाला हुसकावून लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने माणसाचा पाठलाग करत त्या व्यक्तीला चिरडलं.

एखादा बैल किंवा हत्ती पिसाळल्यानंतर तो समोरच्या माणसाचा अखेरपर्यंत पिच्छा पुरवत असतो. असे जंगलातील व्हिडिओ आपण अनेकदा पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात गेंडा दुचाकीस्वारावर हल्ला करून त्याचे डोके चिरडून ठार करतो. गेंड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वाराच्या मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक गेंडा दुचाकीस्वाराचा पाठलाग करताना दिसतोय. दुचाकीस्वार आपल्या बाईकवरून उतरुन गेंड्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी शेतात पळू लागतो. जीव वाचवण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्याचवेळी आजूबाजूचे लोक मोठ्याने ओरडतांना दिसतात. जेणेकरून गेंडा तिथून पळून जाईल. पण असे होत नाही. गेंड्याच्या मानात त्या व्यक्तीला धडक द्यायची असते.

शेवटी गेंडा दुचाकीस्वारावरचा पाठलाग करतो आणि हल्ला चढवतो. त्याला खाली पाडतो आणि चिरडतो. येथे, लोक दुचाकीस्वाराच्या मागे धावतात आणि पाहतात की गेंड्याच्या हल्ल्यात त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेंड्याने त्याचे डोके ठेचले आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता दुचाकीस्वाराचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

SCROLL FOR NEXT